Government Scheme Saam Tv
बिझनेस

Government Scheme: सरकारची खास योजना! कर्मचाऱ्यांना दिले जातात ₹१५०००; तुम्हाला मिळणार का? वाचा पात्रता

PM Vikasit Bharat Rojgar Yojana: प्रधानमंत्री विकसित भारत योजनेअंतर्गत तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध करुन दिली जाते. पहिल्यांदा नोकरीला लागलेल्या तरुणांना १५,००० रुपये दिले जातात.

Siddhi Hande

तरुणांसाठी सरकारची खास योजना

प्रधानमंत्री विकसित भारत योजनेअंतर्गत मिळणार नोकरीची संधी

पहिल्यांदा नोकरी लागल्यावर मिळणार १५००० रुपये

केंद्र सरकारने आतापर्यंत नागरिकांसाठी अनेक योजना राबवल्या आहेत. या योजनांमुळे सर्वसामान्यांना मदत होते. काही योजनांमध्ये आर्थिक मदत केली जाते. अशीच एक योजना तरुणांसाठी राबवण्यात आली आहे. तरुणांसाठी खास प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना राबवली आहे. या योजनेत तरुणांना आर्थिक मदत केली जाते.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी १५ ऑगस्ट २०२५ रोजी ही योजना सुरु केली होती. २ वर्षात तब्बल ३.५ कोटी तरुणांना रोजगार मिळवून देण्याचे या योजनेचे उद्दिष्ट आहे. या योजनेत पहिल्यांदा नोकरी मिळालेल्या तरुणांना १५,००० रुपये दिले जाणार आहेत.

काय आहे योजना? (What is PM Vikasit Bharat Yojana)

पीएम विकसित भारत रोजगार योजनेअंतर्गत सरकार त्या कंपन्यांना आणि बिझनेसला मदत करणार आहे जी कंपनी जास्तीत जास्त कर्मचाऱ्यांना नोकरी देईल. कंपन्यांना प्रत्येक महिन्याला ३००० रुपये दिले जाणार आहेत. त्यामुळे कंपनी आणि कर्मचारी दोघांनाही फायदा होणार आहे. २ वर्षांपर्यंत हे इन्सेंटिव्ह दिले जाणार आहेत. फक्त कर्मचाऱ्यांनी कमीत कमी ६ महिने काम केलेले असावे.

कसे मिळणार पैसे? (PM Vikasit Bharat Yojana)

पहिल्यांदा नोकरी मिळाल्यानंतर आणि ईपीएफओमध्ये (EPFO) रजिस्टर कर्मचाऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. या योजनेअंतर्गत २ हप्त्यांमध्ये पैसे दिले जाणार आहे.ज्यांचा पगार १ लाखांपर्यंत आहे त्यांनाच हे पैसे मिळणार आहे. पहिला हप्ता नोकरीमध्ये ६ महिने पूर्ण झाल्यानंतर मिळणार आहे. दुसरा हप्ता १२ महिने पूर्ण झाल्यानंतर मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Weather : मोठी बातमी! पुढील ३ दिवसांत पावसाची शक्यता, हवामान विभागाने दिली महत्त्वाची अपडेट

Pune Fort : सह्याद्रीतील दगडात कोरलेला अद्भुत किल्ला, पुण्यातील ‘हे’ ठिकाण जपतेय इतिहासाचा वारसा

Cocktail 2 Collection : 'कॉकटेल २' फ्लॉप की हिट? रश्मिका-शाहिद-कृतीच्या 'लव्ह ट्रँगल'नं दोन दिवसांत किती कोटींचा गल्ला जमावला?

ऑपरेशन टायर हाणून पाडण्यासाठी ठाकरेंचा शेवटचा डाव, २ आमदार अचानक ओमराजेंच्या घरी दाखल; मध्यरात्री काय घडलं?

Coffee Tips : कॉफी पिण्याची योग्य वेळ काय? तुम्हाला माहितीये का?

SCROLL FOR NEXT