PM Suryoday Yojana Saam tv
बिझनेस

PM Suryoday Yojana: आता विजेचं बिल होणार शुन्य; पीएम सुर्योदय योजनेअंतर्गत बसवा सोलर पॅनल; लाभ कसा घ्यायचा?

PM Suryoday Yojana: केंद्र सरकारने नागरिकांसाठी पीएम सुर्योदय योजना सुरु केली आहे. पीएम सुर्योदय योजनेअंतर्गत नागरिकांना सोलर पॅनल बनवण्यासाठी सब्सिडी मिळते.

Siddhi Hande

केंद्र सरकारने नागरिकांसाठी अनेक योजना राबवल्या आहेत. अनेक योजनांमध्ये केंद्र सरकार नागरिकांना आर्थिकदृष्ट्या मदत करते. अशीच एक योजना म्हणजे पीएम सुर्योदय योजना. पीएम सुर्योदय योजनेत नागरिकांना सोलर पॅनल बसवण्यासाठी सब्सिडी मिळते. (PM Suryoday yojana)

लवकरच उन्हाळा सुरु होणार आहे. उन्हाळा म्हटल्यावर एसी, कुलर आणि पंखा दिवसभर सुरु असतो. त्यामुळे विजेचे खूप जास्त बिल येते. ज्या लोकांच्या घरी जास्तीत जास्त इलेक्ट्रिक उपकरणे आहेत त्यांना बिल जास्त येते.तसेच हिवाळ्यातदेखील अनेक लोक हिटर, गीजर लावतात. त्यामुळेदेखील बिल येते.परंतु यावर उपाय म्हणजे सोलर पॅनेल.

सोलर पॅनेल लावल्याने तुम्हाला विजेचं बिल कमी येणार आहे. तसेच सोलर पॅनेल बसवण्यासाठी सरकार सब्सिडीदेखील देते. त्यामुळे तुम्ही कमीत कमी खर्चात सोलर पॅनल बसवू शकतात. त्यामुळे विजेचं बिलदेखील वाचेल आणि सोलर पॅनलदेखील बसवले जाईल.

प्रधानमंत्री सुर्योदय योजनेअंतर्गत देशातील विजेचं बिल हे शून्य रुपये करण्याचे लक्ष्. आहे. या योजनेत अनेक घरांवर सोलर पॅनल लावले जातात. या योजनेत एक कोटी नागरिकांना लाभ देण्याचे सरकारचे लक्ष्य आहे.

प्रधानमंत्री सुर्योदय योजनेचा लाभ घेण्यासाठी काही अटी ठेवण्यात आल्या आहेत. यामध्ये ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न दीड लाख किंवा त्यापेक्षा कमी आहे त्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.तसेच ज्या कुटुंबातील सदस्य सरकारी नोकरी करतात किंवा इन्कम टॅक्स भरतात त्यांनादेखील या योजनेचा लाभ दिला जात नाही. (PM Suryday Yojana)

या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. तुम्हाला सोलर पॅनेल लावण्यासाठी https://www.pmsuryaghar.gov.in/ या वेबसाइटवर जाऊन अर्ज करायचा आहे. याच वेबसाइटवर सोलर पॅनेल कसा लावायचा, सब्सिडी कधी मिळणार याबाबत सर्व माहिती देणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'बिझनेससाठी बापाकडून पैसे आण' मानसिक त्रासाला कंटाळली, विवाहित महिलेने उचललं टोकाचं पाऊल | Jalna

Marathi School : मुंबईत मराठी शाळांची दैना, 6 वर्षांत 39 शाळा बंद | VIDEO

EPFO New Rule: EPFO च्या नियमांत मोठा बदल! कर्मचाऱ्यांसह कुटुंबियांनाही होणार फायदा; वाचा सविस्तर

Maharashtra Live News Update: अजित पवार आज बारामतीच्या दौऱ्यावर...

Accident: संभाजीनगरमध्ये अपघाताचा थरार, भरधाव ट्रकने एकाच कुटुंबातील चौघांना चिरडलं, वडिलांसह २ मुलांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT