देशातील नागरिकांच्या हितासाठी अनेक योजना राबवल्या जातात. यामध्ये अनेक योजना महिलांसाठी, लहान मुलांसाठी आणि नागरिकांच्या मुलभूत गरजा भागवण्यासाठी राबवल्या जातात. यामध्ये लोकांना घरं घेण्यासाठी आर्थिक मदत ते अगदी मोफत सिलिंडर देण्यापर्यंत अनेक योजना आहेत. त्यामुळे नागरिकांना खूप फायदा होतो. मोदी सरकारच्या ११ वर्षाच्या काळात अनेक योजना राबवण्यात आल्या आहेत. चला तर मग आपण मोदी सरकारच्या काळात राबवलेल्या योजनांची माहिती घेऊया.
देशातील सर्व नागरिकांना बँकिंग क्षेत्राशी जोडण्याच्या उद्देषाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जन धन योजना सुरु केले. यामध्ये देशातील नागरिकांना बँकामध्ये अकाउंट उघडण्यासाठी प्रोत्साहन केले जाते. त्यामुळे देशातील प्रत्येक नागरिकाचे बँकेत अकाउंट उघडण्यास सुरुवात झाली. २०१४ साली ही योजना सुरू करण्यात आली होती.
प्रत्येक गरीब कुटुंबातील व्यक्तीला त्याचे हक्काचे आणि स्वतः चे घर घेण्यासाठी आर्थिक मदत केली जाते. त्यामुळे त्यांनी पीएम आवास योजना सुरु केली आहे. पीएम आवास योजनेअंतर्गत आतापर्यंत ४ कोटींहून अधिक घरे बांधून देण्यात आली आहेत.
पीएम उज्जवला योजना ही २०१६ साली सुरु करण्यात आली. या योजनेअंतर्गत दारिद्यरेषेखालील कुटुंबाना मोफत गॅस कनेक्शन मिळते. तसेच १२ सिलिंडर अनुदानावर मिळतात. आतापर्यंत १० कोटी लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे.
पीएम सुरक्षा विमा योजना हा २०१५ साली सुरु करण्यात आली. याअंतर्गत १८ ते ७० वयोगटातील लोकांना अपघातील विमा संरक्षण दिले जाते. सरकार २ लाखांपर्यंतचा अपघात विमा प्रदान करते. तर अंपगत्व आल्यास एक लाख रुपयांचे संरक्षण दिले जाते.
अटल पेन्शन योजनेअंतर्गत सरकार गुंतवणूकीवर पेन्शनची हमी देते. तुम्हाला सेवानिवृत्तीनंतर दर महिन्याला पेन्शन मिळते. असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांसाठी ही योजना राबवण्यात आली आहे. या योजनेत तुम्हाला वयाच्या ६० वर्षानंतर ५००० रुपयांची पेन्शन मिळते.
आयुष्मान भारत योजनेअंतर्गत नागरिकांना ५ लाखांपर्यंतचे मोफत उपचार दिले जातात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१८ मध्ये ही योजना सुरु केली आहे. याअंतर्गत तुम्हाला आयुष्मान कार्ड मिळते.आतापर्यंत ३४ कोटींहून अधिक लोकांनी आयुष्मान कार्ड बनवण्यात आले आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.