PM Mudra Loan Saam Tv
बिझनेस

PM Mudra Loan: व्यवसाय सुरू करायचाय,पैसे नाहीत? टेन्शन सोडा, सरकार देतेय १० लाखांचे कर्ज, जाणून घ्या योजना

Siddhi Hande

अनेकांचे स्वतः चा बिझनेस सुरु करण्याचे स्वप्न असते. परंतु अनेकदा स्वतः चा व्यवसाय सुरु करण्यासाठी पुरेसे भांडवल नसते.व्यवसाय सुरु करण्यासाठी शिक्षण, मेहनतीसोबतच पैशांची गुंतवणूक खूप महत्त्वाची असते. त्यामुळे सरकारने नागरिकांसाठी एक योजना राबवली आहे. पीएम मुद्रा योजनेअंतर्गत स्वतः चा व्यवसाय सुरु करण्यासाठी लोन दिले जाते.

पीएम मुद्रा योजनेअंतर्गत सरकार स्वतः चा बिझनेस सुरु करण्यासाठी १० लाखांचे लोन देते. भारतातील कोणताही नागरिक या योजनेसाठी अर्ज करु शकतात.

पीएम मुद्रा योजनेची सुरुवात २०१५ साली सुरु करण्यात आली आहे. या योजनेत याआधी १० लाख रुपये लोन दिले जायचे. मात्र, आता या योजनेत डबल म्हणजेच २० लाखांचे लोनदेखील दिले जाते. या योजनेबाबत सर्व माहिती जाणून घेऊया.

पीएम मुद्रा योजनेत तीन कॅटेगरीमध्ये लोन दिले जाते. शिशु लोन, किशोर लोन आणि तरुण लोन या कॅटेगरीत लोन दिले जाते. शिशु लोनअंतर्गत तुम्हाला ५० हजार रुपये दिले जातात. त्यासाठी कोणत्याही गॅरंटीची गरज नाही. किशोर लोनअंतर्गत ५० हजार ते ५ लाखांपर्यंत लोन दिले जाते. तसेच तरुण लोनअंतर्गत ५ लाख ते २० लाखांपर्यंत लोन दिे जाते.

शिशु मुद्रा योजनेत लोन घेताना तुम्हाला कोणत्याही गॅरंटीची गरज नाही. तसेच या योजनेसाछी प्रोसेस चार्जदेखील लागत नाही. या योजनेत तुम्हाला ९ ते १२टक्के व्याज द्यावे लागते.पीएम मुद्रा लोन योजनेअंतर्गत लहान दुकानदार, फल, फूड प्रोसेसिंग युनिट असे लहान उद्योग सुरु करण्यासाठी लोन दिले जाते.

या योजनेत १८ वर्षांवरील कोणताही भारतीय नागरिक अर्ज करु शकतात. अर्जदाराची कोणतीही डिफॉल्ट बँक हिस्ट्री नसायला हवी. त्याचसोबत बँक अकाउंट असायला हवे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jalgaon News : वास्तुशांतीसाठी जवान रजा घेऊन आला, वडिलांच्या मदतीला गेले अन् काळाने घाला घातला

Ratan Tata Passed Away : उपमुख्यमंत्री अजित पवारांसह राष्ट्रवादीच्या नेत्यांनी घेतलं रतन टाटांच अंत्यदर्शन

Viral Video: पाकिस्तानमध्ये'मिनी इंडिया'! कराचीमधील नवरात्री उत्सवाचा व्हिडीओ पाहून डोळ्यावर विश्वास बसणार नाही

Maharashtra Politics : नगरचं राजकारण पुन्हा तापले, विखेंचा लंकेंवर हल्लाबोल; म्हणाले पराभवाने मी खचलो नाही

Health Tips: रिकाम्या पोटी दुधासोबत 'या' फळाचे सेवन करणे फायदेशीर

SCROLL FOR NEXT