PM Kisan Yojana Saam Tv
बिझनेस

PM Kisan Yojana: शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! हे काम कराच, अन्यथा मिळणार नाही पीएम किसानचे ₹२०००

PM Kisan Yojana 21st Installment Update: पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. पीएम किसान योजनेचा हप्ता मिळवण्यासाठी तुम्हाला केवायसी करणे अनिवार्य आहे.

Siddhi Hande

पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. पीएम किसान योजनेचा ऑक्टोबरचा हप्ता लवकरच शेतकऱ्यांना दिला जाणार आहे. यावेळी पीएम किसान योजनेचा हप्ता लांबणीवर गेला आहे. शेतकरी आतुरतेने पीएम किसान योजनेच्या हप्त्याची वाट पाहत आहे. ऑक्टोबर महिन्यात हा हप्ता येण्याची शक्यता होती. मात्र, आता ऑक्टोबर महिनादेखील संपत आला आहे. दरम्यान, पीएम किसान योजनेचा हप्ता मिळवण्यासाठी तुम्हाला हे काम करावे लागणार आहे.

पीएम किसान योजनेसाठी केवायसी अनिवार्य (PM Kisan Yojana KYC Mandatory)

पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी शेतकऱ्यांना केवायसी करणे अनिवार्य आहे. जर तुम्ही केवायसी केले नाही तर तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार आहे. तुम्ही ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीने केवायसी करु शकतात.

ऑनलाइन प्रोसेस (PM Kisan Yojana KYC Online Process)

  • सर्वात आधी तुम्हाला पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर जायचे आहे.

  • यानंतर फार्मर्स कॉर्नरवर क्लिक करा.

  • यानंतर तुम्ही तुमचा आधार क्रमांक आणि नोंदणीकृत मोबाईल नंबर टाकावा.

  • यानंतर तुमच्या मोबाईलवर ओटीपी येईल तो टाका. त्यानंतर केवायसी पूर्ण करा.

तुम्ही तुमच्या जवळच्या CSC सेंटरवर जाऊनदेखील केवायसी पूर्ण करु शकतात. यासाठी तुम्हाला काही महत्त्वाची कागदपत्रे आवश्यक आहेत.

कधी येणार पीएम किसान योजनेचा हप्ता? (PM Kisan Yojana 21st Installment Date)

पीएम किसान योजनेचा हप्ता हा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात येऊ शकतो. नोव्हेंबर महिन्यात बिहारच्या निवडणुका आहे. ९ ते ११ नोव्हेंबर या कालावधीत निवडणुक होणार आहे. त्यामुळे त्याआधी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होण्याची शक्यता आहे. अद्याप याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: यवतमाळ जिल्ह्यात जिओचा नेटवर्क ठप्प

Belly Fat Loss Tips: वजन कमी करण्यासाठी आहारात हे 5 पदार्थ नक्की खा

IAS 3rd Marriage: आयएएस अधिकाऱ्याचे तिसरं लग्न, पहिल्या दोन्ही पत्नी IAS, तर आताची पत्नी आहे मंत्रालयात कामाला

Video Viral: कॉलेजबाहेर सर्वांसमोर विद्यार्थ्यांने गुडघ्यावर बसून केलं प्रपोज, शिक्षिकेची रिएक्शन व्हायरल

Dombivli : डोंबिवलीत जबरी घरफोडी! बंद घरावर चोरट्यांची नजर, सेफ्टी डोअर तोडून ४० तोळे सोने लंपास

SCROLL FOR NEXT