PM Kisan Yojana Google
बिझनेस

PM Kisan Yojana: या शेतकऱ्यांना मिळणार नाही पीएम किसान योजनेचा पुढचा हप्ता; तुमचंही नाव आहे का? चेक करा

PM Kisan Yojana These Farmers Wont Get Money: पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आता पीएम किसान योजनेत काही शेतकऱ्यांना पुढचा हप्ता मिळणार नाहीये.

Siddhi Hande

पीएम किसान योजनेचा २१वा हप्ता लवकरच मिळणार

या शेतकऱ्यांना मिळणार नाहीत २००० रुपये

जर पीएम किसान योजनेचे पैसे हवे असतील तर हे काम करा

केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी पीएम किसान सन्मान निधी योजना सुरु केली आहे. पीएम किसान योजनेत शेतकऱ्यांना दर ४ महिन्यांनी २००० रुपये दिले जातात. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत वर्षाला ६००० रुपये दिले जातात. दरम्यान आता २०वा हप्ता देण्यात आला आहे. पुढचा हप्ता लवकरच दिले जाणार आहेत.

शेतकऱ्यांना आता पीएम किसान योजनेत २१ वा हप्ता दिला जाणार आहे.या योजनेत ४ महिन्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा केले जातील. दरम्यान, काही शेतकऱ्यांना २१वा हप्ता मिळणार नाही. या योजनेत कोणत्या शेतकऱ्यांना पैसे मिळणार नाहीत ते जाणून घ्या.

या शेतकऱ्यांना मिळणार नाही २१वा हप्ता

देशातील कोट्यवधी शेतकरी पीएम किसान योजनेचा लाभ घेत आहेत. २०वा हप्ता दिल्यानंतर आता शेतकरी २१व्या हप्त्याची वाट पाहत आहेत. दरम्यान, ज्या शेतकऱ्यांनी केवायसी केलेले नाही त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाहीये. ज्या शेतकऱ्यांनी केवायसी केली नाही त्यांना योजनेचा लाभ मिळण्यास अडचणी येतील. त्यामुळे तुमच्या खात्यात पैसे जमा होणार नाहीत. यामुळे लवकरात लवकर केवायसी करा.

आधार नंबर, बँक डिटेल्स किंवा नावात जर चुकी असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळण्यास अडचण येईल. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमचा पूर्ण रेकॉर्ड योग्य असायला हवा आणि अपडेट होणार गरजेचे आहे.

जर तुमच्या रेकॉर्डमधील माहिती आणि केवायसीमधील माहिती मॅच झालेली नाही तर त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाहीये. या योजनेतील लाभार्थ्यांना eKYC पूर्ण करणे गरजेचे आहे.

स्टेट्‍स कसा चेक करायचा? (How To Check Status of PM Kisan Yojana)

पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी pmkisan.gov.in वर जावे लागेल.

त्यानंतर फार्मर्स कॉर्नरवर जा. यानंतर Beneficiary Status वर क्लिक करा.

यानंतर तुमचा रजिस्टर मोबाईल नंबर किवंवा आधार कार्डची माहिती भरा.

यानंतर Get Data वर क्लिक करा. यानंतर तुम्हाला पेमेंटचा स्टेट्‍स दिसणार आहे.

पीएम किसान योजना कोणी सुरु केली?

पीएम किसान योजना केंद्र सरकारने सुरु केली आहे.

पीएम किसान योजनेत किती रुपये मिळतात?

पीएम किसान योजनेत शेतकऱ्यांना वर्षभरात ६००० रुपये मिळतात. दर चार महिन्यांनी २००० रुपये दिले जातात.

पीएम किसान योजनेचा लाभ कोणाला मिळणार नाही?

पीएम किसान योजनेचा लाभ ज्या शेतकऱ्यांनी केवायसी केले नाही त्यांनी मिळणार नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Kisan Yojana : शेतकऱ्याच्या खात्यावर किती वाजता जमा होणार ₹२०००? पीएम किसान योजनेची महत्त्वाची अपडेट आली समोर

पुण्यात रक्तरंजित थरार; नराधमाने 'लिव्ह-इन पार्टनर'च्या ३ वर्षीय मुलाला क्रूरपणे संपवलं, धक्कादायक कारण समोर

Haunted Fort : भारतातील ५ सर्वात भयानक अन् रहस्यमय किल्ले, सूर्यास्तानंतर येथे जाण्याची कोणी हिंमतच करत नाही

Director-Actress : अभिनेत्रीला जवळ ओढलं, कमरेत हात टाकला अन्...; प्रसिद्ध दिग्दर्शकानं मर्यादा ओलांडल्या, VIDEO तुफान व्हायरल

"ते सेल्फी पूर्णपणे मॉर्फ केलेले..."; व्हायरल फोटोंवर मंत्री गिरीश महाजनांचा सर्वात मोठा आणि थेट खुलासा

SCROLL FOR NEXT