PM Kisan Yojana Saam Tv
बिझनेस

PM Kisan Yojana: या शेतकऱ्यांच्या खात्यात येणार ४००० रुपये; मिळणार डबल फायदा

PM Kisan Yojana 20th Installment Date: पीएम किसान योजनेचा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाणार आहे. दरम्यान, काही शेतकऱ्यांना ४००० रुपये मिळणार आहेत.

Siddhi Hande

भारत सरकारने शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवल्या आहेत. यातील एक योजना म्हणजे पीएम किसान सन्मान निधी. पीएम किसान सन्मान निधी योजनेत शेतकऱ्यांना दरवर्षी ६००० रुपये दिले जातात. यात दर चार महिन्यांनी २००० रुपये दिले जातात. दरम्यान, आता जून महिन्यात हे पैसे दिले जाणार आहेत.२० जून रोजी हे पैसे दिले जाण्याची शक्यता आहे. या योजनेत आता काही शेतकऱ्यांना ४००० रुपये दिले जाणार आहेत.

पीएम किसान योजनेत (PM Kisan Yojana) या महिन्यात शेतकऱ्यांना खुशखबर मिळणार आहे. त्यांच्या खात्यात २००० रुपये दिले जातात. या योजनेचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळते. शेतकऱ्यांच्या शेतीच्या कामांसाठी मदत व्हावी, म्हणून हे पैसे दिले जातात. दरम्यान, या राज्यातील शेतकऱ्यांना ४००० रुपये मिळणार आहेत.

या शेतकऱ्यांना मिळणार डबल फायदा (These Farmer Will Get 4000 Rupees)

मध्य प्रदेशमधील शेतकऱ्यांना डबल फायदा मिळणार आहे. मध्य प्रदेशमधील शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत २००० रुपये दिले जातात. तसेच या राज्याती मुख्यमंत्री कल्याण योजनेअंतर्गत २००० रुपये दिले गेले होते. या योजनेत शेतकऱ्यांना केंद्राकडून ६००० रुपये आणि राज्य सरकारकडून ६००० रुपये दिले जातात.

२०वा हप्ता लवकरच मिळणार (PM Kisan Yojana 20th Installment Date)

पीएम किसान सन्मान निधी योजनेचा २०वा हप्ता लवकरच दिला जाणार आहे. २० जानेवारी रोजी हे पैसे खात्यात जमा केले जाणार आहेत. याआधीचा हप्ता फेब्रुवारी महिन्यात दिला जातो. त्यानंतर आता पुढचा हप्ता दिला जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Women Health: महिलांची मासिक पाळी थांबण्याचे वय कोणते?

UPI यूजर्ससाठी गुड न्यूज! NPCI ने वाढवली लिमिट, २४ तासांत करता येणार लाखोंचे व्यवहार

Whatsapp News : ...तर तुमचं Whatsapp अकाउंट होऊ शकतं हॅक; केंद्र सरकारच्या सायबर सुरक्षा एजन्सीचा मोठा इशारा

Devendra Fadnavis: हे राज्य असेपर्यंत ओबीसीवर अन्याय होणार नाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस|VIDEO

Nandurbar Politics : नंदुरबार जिल्ह्यात शरद पवार गटाला मोठा धक्का; महिला जिल्हाध्यक्षांसह शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT