PM Kisan Yojana Saam Tv
बिझनेस

PM Kisan Yojana: बळीराजासाठी खुशखबर! या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार ₹२०००

PM Kisan Sanman Nidhi Yojana 20th Installment Date: पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत आता शेतकऱ्यांना लवकरच २०वा हप्ता मिळणार आहे. जून महिन्यात हे पैसे जमा केले जाणार आहेत.

Siddhi Hande

केंद्र सरकारची शेतकऱ्यांसाठी राबवलेली पीएम किसान योजना खूप लोकप्रिय झाली आहे. पीएम किसान योजनेचा कोट्यवधी शेतकरी लाभ घेत आहेत. शेतकऱ्यांना आर्थिक मदत व्हावी, या उद्देशातून ही योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेत शेतकऱ्यांना दरवर्षी ६००० रुपये दिले जातात. दरम्यान, आता लवकरच शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा २०वा हप्ता मिळणार आहे.

या दिवशी जमा होणार २०वा हप्ता

पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत दर चार महिन्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे दिले जातात. दर चार महिन्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यात २००० रुपये जमा केले जातात. आतापर्यंत १९ हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले आहेत.शेवटचा हप्ता फेब्रुवारी महिन्यात जमा केला होता. दरम्यान, जून महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात जमा होईल असं सांगण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यात येत्या काही दिवसांत पैसे जमा होणार आहे.

पैसे मिळवण्यासाठी हे काम लगेच करा

पीएम किसान योजनेचा हप्ता मिळवण्यासाठी तुम्हाला केवायसी करणे खूप गरजेचे आहे. जर तुम्ही केवायसी केले नाही तर तुमच्या खात्यात पैसे जमा होणार नाहीत. यासाठी तुम्ही ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीने केवायसी करु शकतात.

तुम्ही तुमच्या जवळच्या सीएससी केंद्रात जाऊन केवायसी पूर्ण करु शकतात. याचसोबत ऑनलाइन पद्धतीने घरबसल्याही हे काम करु शकतात.

तुम्हाला सर्वात आधी pmkisan.gov.in या वेबसाइटवर जायचे आहे.

यानंतर फार्मर कॉर्नरवर क्लिक करायचे आहे.

यानंतर तुम्हाला केवायसीचा ऑप्शन दिसेल.

त्यावर क्लिक करुन आधार नंबर टाका.

तुमच्या आधारशी लिंक असलेल्या नंबरवर ओटीपी येईल. त्यानंतर व्हेरिफिकेशन पूर्ण होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shivali Parab : सोज्वळ साज अन् निखळ हास्य, शिवाली परबचे पाहा लेटेस्ट PHOTOS

Pitru Paksha: पितृपक्षात 'या' ३ गोष्टी घरी आणू नका, अन्यथा घरात होऊ शकतात अडचणी

Maharashtra Live News Update: धुळ्यात भयंकर अपघात, दोघांचा जागीच मृत्यू, एक जखमी

Ganpati Visarjan 2025 : पुण्यात ३० तासानंतरही विसर्जन मिरवणुका सुरुच, गणेश मंडळाने डीजे लावला अन् फटाके फोडले, पोलिसांचा आदेश धाब्यावर

शरीरात प्रोटीनची कमतरता झाल्यास दिसतात 'हे' बदल

SCROLL FOR NEXT