PM Kisan Yojana Saam Tv
बिझनेस

PM Kisan Yojana: एका कुटुंबातील किती जण घेऊ शकतात पीएम किसानचा लाभ? कोणाला मिळणार ₹६०००? वाचा नियम

PM Kisan Yojana Eligibility: पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी काही अटी निश्चित करण्यात आल्या आहेत. या पात्रतेत बसत असाल तरच तुम्हाला योजनेचा लाभ मिळतो.

Siddhi Hande

पीएम किसान योजनेचे नियम

एका कुटुंबातील किती व्यक्ती घेऊ शकतात लाभ?

नियम काय सांगतात?

देशातील कोट्यवधी शेतकरी पीएम किसान योजनेचा लाभ घेत आहेत. पीएम किसान योजनेत शेतकऱ्यांना दरवर्षी ६००० रुपये दिले जातात. दरम्यान, दर चार महिन्यांनी हे पैसे दिले जातात. हे पैसे फक्त त्याच शेतकऱ्यांना मिळतात जे या योजनेसाठी पात्र आहे. दरम्यान, या योजनेची पात्रता जाणून घ्या.

पीएम किसान योजनेचा पुढचा हप्ता कधी येणार असा प्रश्न विचारला जत आहे. त्याचसोबत आता हा हप्ता कोणाला मिळणार, कोणाला हप्ता मिळणार नाही असा प्रश्न पडला आहे. याबाबतचे नियम खूप सोपे आहेत. त्यामुळे नियम जाणून घ्या.

एका कुटुंबातील किती लोक योजनेचा लाभ घेऊ शकतात?

पीएम किसान योजनेत एका कुटुंबातील फक्त १ व्यक्ती लाभ घेऊ शकतात.या शेतकऱ्यांसाठी पात्रतेनुसार जमीन असायला हवी. या जमिनीच्या आधारावर फक्त एकच व्यक्ती योजनेचा लाभ घेऊ शकतात. ज्या व्यक्तीच्या नावावर जमीन आहे ते योजनेचा लाभ घेऊ शकतात.जर कुटुंबातील इतर व्यक्तीदेखील शेती करत असतील तरीही एकालाच लाभ मिळणार आहे.

एकापेक्षा जास्त लोकांना फायदा मिळतो का?

जर कुटुंबात दोन व्यक्ती आहेत. या दोघांच्या नावावर वेगवेगळी जमीन आहे तेव्हा दोन व्यक्ती योजनेचा लाभ घेऊ शकतात. दरम्यान, सरकारी रेकॉर्डमध्ये या दोघांचेही कुटुंब वेगवेगळे असल्याची नोंद असावी.जमिनीची नोंद, ओळखपत्र व्हेरिफिकेशन झाल्यानंतरच या योजनेतील लाभार्थ्यांना लाभ मिळतो. दरम्यान यासाठी तुम्हाला pmkisan.gov.in वर जाऊन अर्ज करायचा आहे. याचसोबत जवळच्या सीएससी केंद्रात जाऊन अर्ज करु शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jantar Mantar Protest: जंतरमंतरवर पुन्हा परिस्थिती बिघडली; विद्यार्थ्यांवर पुन्हा लाठीचार्ज, पोलिसांवर दगड, बाटल्या फेकल्या

नागपुरात धक्कादायक घटना! दुपारी सुट्टीच्या वेळी चक्कर आली; उपचारादरम्यान तिसरीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू

Schools Closed: पालघर जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालय आणि अंगणवाड्यांना उद्या सुट्टी,काय आहे कारण जाणून घ्या

दिल्लीतील आंदोलनात मराठा एल्गार, पुन्हा हल्ला केल्यास सरकारचा माज उतरवणार

दिल्लीत शरद पवार-पंतप्रधान मोदींची भेट भेटीमागे नेमकं गुपित काय?

SCROLL FOR NEXT