Shreya Maskar
खडकवासला तलाव हा मुठा नदीवरील खडकवासला धरणामुळे निर्माण झालेला जलाशय आहे. हा तलाव पुणे शहराच्या मध्यवर्ती भागापासून नैऋत्येला सुमारे २० ते २१ किलोमीटर अंतरावर, सिंहगड किल्ल्याकडे जाणाऱ्या मार्गावर स्थित आहे.
खडकवासला तलाव हा पुणे शहरासाठी पिण्याच्या पाण्याचा मुख्य स्रोत आणि पर्यटकांचे एक लोकप्रिय पिकनिक स्पॉट म्हणून ओळखला जातो.
पुण्यापासून सुमारे २० किमी अंतरावर असलेला खडकवासला तलाव पावसाळ्यात एका सुंदर पर्यटन स्थळात रूपांतरित होतो. तुम्ही येथे भन्नाट फोटोशूट करू शकता.
पावसाळ्यात धरणातून ओसंडून वाहणारे पाणी, धुक्याने वेढलेल्या टेकड्यांची पार्श्वभूमी पाहून तुम्ही वेडे व्हाल. येथे चटपटीत खाण्याचे स्टॉल्स आहेत.
येथे भाजलेला मका, चहा आणि स्थानिक खाद्यपदार्थ विकणाऱ्या विक्रेत्यांची रेलचेल असते. संध्याकाळी येथे निवांत फेरफटका मारायला जा.
खडकवासला तलावावरून सूर्यास्ताचा सुंदर नजारा पाहायला मिळतो. पावसाळ्यात येथील वातावरण अतिशय आल्हाददायक असते.
खडकवासला गेल्यावर सिंहगड किल्ला आणि पानशेत धरणाला भेट द्या. येथे निसर्गाचा सुंदर नजारा पाहायला मिळतो.
वरील माहितीचा उद्देश केवळ पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.