PM KISAN SCHEME EXTENDED TILL 2031: CENTRE APPROVES ₹3.15 LAKH CRORE FOR FARMERS  Saam Tv
बिझनेस

PM Kisan Yojana : PM किसान योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय! २०३० - ३१ पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात वर्षाला येणार ६,००० रुपये

PM Kisan Yojana Government Scheme Update : केंद्र सरकारने पीएम-किसान योजना २०३०-३१ पर्यंत सुरू ठेवण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. ₹३.१५ लाख कोटींच्या निधीला मंजुरी देण्यात आली असून पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी ₹६,००० आर्थिक मदत मिळत राहणार आहे. जाणून घ्या संपूर्ण माहिती.

Alisha Khedekar

  • केंद्र सरकारने पीएम-किसान योजना २०३०-३१ पर्यंत सुरू ठेवण्यास मंजुरी दिली

  • योजनेसाठी ₹३.१५ लाख कोटींच्या निधीची तरतूद

  • पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी ₹६,००० आर्थिक मदत DBT द्वारे मिळत राहणार

  • आतापर्यंत २३ हप्त्यांद्वारे ₹४.४७ लाख कोटींपेक्षा अधिक रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा

  • केंद्राने प्रधानमंत्री सूर्य सरोवर योजनेलाही मंजुरी दिली

शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज! केंद्र सरकारने पीएम-किसानबाबत मोठा निर्णय घेतला आहे. पीएम-किसान ही योजना २०३० ते २०३१ पर्यंत सुरू ठेवण्यात येणार आहे. या योजनेसाठी केंद्र सरकारने ३.१५ लाख कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली असून, देशातील पात्र शेतकरी कुटुंबांना याचा मोठा लाभ मिळणार आहे.

केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही माहिती देताना सांगितले की, "शेतकऱ्यांची समृद्धी ही देशाच्या प्रगतीचा मजबूत पाया आहे. त्याच उद्देशाने पात्र शेतकरी कुटुंबांना प्रत्यक्ष DBT प्रणालीद्वारे आर्थिक मदत दिली जात आहे." फेब्रुवारी २०१९ मध्ये सुरू झालेल्या पीएम-किसान योजनेअंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबांना दरवर्षी ६,००० रुपयांची आर्थिक मदत तीन हप्त्यांमध्ये त्यांच्या बँक खात्यात थेट जमा केली जाते.

या योजनेमुळे लाखो शेतकऱ्यांना शेतीसाठी खर्च भागवण्यास मदत होते. मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत या योजनेच्या २३ हप्त्यांद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यात ४.४७ लाख कोटी रुपयांहून अधिक रक्कम थेट जमा करण्यात आली आहे. ही योजना पुढील पाच वर्ष सुरू राहिल्यामुळे कृषी क्षेत्रातील गुंतवणुकीला चालना मिळेल, उत्पादनक्षमतेत वाढ होईल आणि ग्रामीण अर्थव्यवस्था अधिक बळकट होईल, तसेच शेतकऱ्यांना आर्थिक बळकटी मिळेल असा सरकारचा विश्वास आहे.

प्रधानमंत्री सूर्य सरोवर योजनेला केंद्राची मंजुरी

केंद्र सरकारने प्रधानमंत्री सूर्य घर योजनेनंतर आता प्रधानमंत्री सूर्य सरोवर योजनेला मंजुरी दिली आहे. या योजनेअंतर्गत धरणे, जलाशय आणि तलावांमध्ये तरंगत्या सौर पॅनेलच्या माध्यमातून वीज निर्मिती केली जाणार आहे. पाच वर्षांच्या कालावधीत राबवण्यात येणाऱ्या या योजनेसाठी सुमारे ५,०७० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, देशातील जलाशयांमधून १०२.१८ गीगावॅट वीज निर्मितीची क्षमता उपलब्ध आहे. वाढत्या वीज मागणीची पूर्तता करण्यासाठी या प्रकल्पात दोन तासांची ऊर्जा स्टोरेज करण्याची सुविधाही उभारली जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: राज ठाकरेंच्या दौऱ्यापूर्वी मनसेला मोठा धक्का, बड्या नेत्यासह पदाधिकाऱ्यांचे तडकाफडकी राजीनामे

Maharashtra News Live: त्र्यंबकेश्वरच्या ब्रह्मगिरी पर्वताखालील जांबाची वाडी धोक्यात, जमिनीला पडू लागल्या भेगा

स्लिव्हलेस ब्लाऊजच्या लेटेस्ट 5 डिझाईन्स; लग्न, पार्टी लूक दिसेल एकदम भारी

Aadhaar Card : आधार कार्डमध्ये पत्ता अपडेट करणे झालं आणखी सोपं! नवीन Aadhaar App वरून घरबसल्या करा अर्ज, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

Raj Thackeray: १२ वर्षात तुम्ही जे पेरलंय तेच उगवलंय; राज ठाकरेंचा मोदी सरकारवर घणाघात

SCROLL FOR NEXT