PM Kisan 24th Installment Update google
बिझनेस

PM Kisan Yojana : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसान योजनेचा २४ वा हप्ता 'या' दिवशी खात्यात होणार जमा

PM Kisan 24th Installment: पीएम किसान योजनेच्या २४ व्या हप्त्याबद्दल मोठी अपडेट समोर आली आहे. ऑक्टोबर २०२६ मध्ये २००० रुपये जमा होण्याची शक्यता असून लाभासाठी आधार सीडिंग, जमीन पडताळणी आणि फेस ऑथेंटिकेशन आवश्यक आहे.

Sakshi Sunil Jadhav

शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. सरकार नेहमीच शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी म्हणून नवनवीन योजना राबवत असतं. त्यातलीच प्रसिद्ध योजना म्हणजे पीएम किसान योजना. आत्तापर्यंत या योजनेचे २३ हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत. तर २४ व्या हप्त्याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.

सरकारने पीएम किसान योजनेचा २३ वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात २० जून रोजी जमा केला होता. या हप्त्यात २ हजार रुपयांचा निधी जमा झाला होता. पीएम किसान योजनेत वर्षाला ६००० रुपयांची मदत केली जाते. तर वर्षाला ३ हप्त्यांमध्ये ती शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठवली जाते. तर तुम्हाला २४ व्या हप्त्याचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही पुढील प्रोसेस वेळेत पूर्ण करणं गरजेचं आहे.

२४ वा हप्ता कधी येणार? (PM Kisan 24th Installment Date)

पीएम किसान योजनेअंतर्गत हप्ते दर चार महिन्यांनी दिला खात्यात पाठवला जातो. २३ वा हप्ता २० जून २०२६ रोजी पाठवला होता. तर २४ वा हप्ता हा ऑक्टोबर २०२६ मध्ये पाठवला जाण्याची शक्यता आहे. तेव्हाच शेतकऱ्यांच्या खात्यात २००० रुपये जमा केले जातात. तर २० तारखेला हा हप्ता जमा होण्याची शक्यता आहे.

कोणत्या शेतकऱ्यांना लाभ मिळणार नाही?

सरकारच्या कोणत्याही योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही त्यांचे नियम पाळणं गरजेचं आहे. त्यासाठी आधार सीडिंग, जमीनीची कागदपत्रे आणि फेस ऑथेंटिकेशन करणं गरजेचं आहे. तरच तुम्हाला २४ व्या हप्त्याचा लाभ मिळू शकतो. तसेच ज्या शेतकऱ्यांनी १ फेब्रुवारी २०२९ नंतर शेतजमिनिचा मालकी हक्क मिळवला आहे. जर एकाच कुटुंबातले एकापेक्षा जास्त सदस्य या योजनेचा लाभ घेतला आहे अशांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Black Raisins for Weight Loss: रोज सकाळी काळे मनुके खाल्ल्याने वजन खरंच कमी होतं का? जाणून घ्या योग्य पद्धत

रक्षाबंधनाला खरेदीची गोल्डन संधी; सोनं ३००० रुपयांनी स्वस्त; सुवर्णनगरीत 22K, 24K चा आजचा भाव किती?

Maharashtra News Live Update: सोलापुरातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना 1 लाख राख्या पाठवणार

Ganeshotsav 2026: मुंबईतील गणेश मंडळांसाठी BESTची ‘वीज गाईडलाईन’, ११ अटी पूर्ण केल्यावरच मिळणार जोडणी

आश्रमशाळेत संतापजनक प्रकार! २१ मुलींचा विनयभंग; दहावीच्या विद्यार्थिनीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT