PM Kisan Yojana 24th Installment  meta ai
बिझनेस

PM Kisan : शेतकऱ्यांच्या खात्यात २ हजार की थेट ₹४,००० जमा होणार? कुणाला मिळणार डबल पैसे? पाहा अपडेट

PM Kisan 24th installment date : पीएम किसान योजनेच्या २४ व्या हप्त्याबाबत शेतकऱ्यांना उत्सुकता आहे. नियमित हप्त्यात ₹२,००० मिळतात; मात्र ₹४,००० मिळणार असल्याच्या दाव्याची अधिकृत पुष्टी झालेली नाही.

Namdeo Kumbhar

PM Kisan Yojana 24th Installment : देशातील करोडो शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा २४ वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. या नवीन हप्त्यामध्ये काही पात्र शेतकऱ्यांना २ हजार रुपयांऐवजी थेट ४,००० रुपये मिळण्याची चर्चा रंगली आहे. नेमके कोणाला हे वाढीव पैसे मिळणार आणि त्यासाठी काय नियम आहेत?

केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी 'प्रधानमंत्री किसान सन्मान निधी' योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी आर्थिक मदत दिली जाते. प्रत्येक वर्षाला ६ हजार रूपये ३ टप्प्यात दिले जातात. या योजनेचा पुढील २ हजार रूपयांचा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पण काही शेतकऱ्यांना ४ हजार रूपयांचा सन्मान निधी मिळणार असल्याचे समजतेय.

काय आहेत चर्चा आणि नियम?

अनेकांच्या मनात असा प्रश्न आहे की, या वेळी शेतकऱ्यांच्या खात्यात २,००० रुपये येणार की ४,००० रुपये? नियमांनुसार, जर मागील हप्ता काही तांत्रिक कारणांमुळे अडकला असेल आणि तो या हप्त्यासोबत जमा होतो. यावेळीही काही शेतकऱ्यांना एकत्रित ४,००० रुपयांचा लाभ मिळू शकतो. पण नियमितपणे हप्ते मिळणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यात २,००० रुपयांचाच हप्ता जमा होईल.

पैसे मिळण्यासाठी काय तपासावे?

तुमचे बँक खाते आधार कार्डशी जोडलेले (Aadhaar Seeded) असणे गरजेचे आहे.

ई-केवायसी (e-KYC) प्रक्रिया पूर्ण केलेली असावी.

भूमी अभिलेखांची (Land Records) पडताळणी पूर्ण झालेली असणे आवश्यक आहे.

जर वरील सर्व गोष्टी पूर्ण असतील, तर २४ व्या हप्त्याचे पैसे तुमच्या खात्यात विनाअडथळा जमा होईल. तुमचे नाव लाभार्थी यादीत आहे की नाही, हे तुम्ही पीएम किसानच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन चेक करू शकता. त्यासाठी सोप्या स्टेप्स फॉलो कराव्यात. पुढील काही दिवसांत २४ व्या हप्त्याबाबत अधिकृत माहिती दिली जाऊ शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पोलीस स्टेशमध्ये ज्युनिअर ठाकरेंचा आक्रमकपणा, जीपच्या टपावर उभं राहत केली मोठी घोषणा| Photos

Skin Care: ऑक्टोबर हिटमुळे चेहरा ड्राय आणि काळा पडलाय? मग रात्री झोपण्यापूर्वी करा 'हा' सोपा उपाय

Monday Horoscope: या ४ राशींच्या लोकांनी आज पैशांच्या बाबतीत राहावे सावध; खर्च करताना घ्या विचारपूर्वक निर्णय

Navratri Look : गरबा-दांडियासाठी ट्रेंडी आउटफिट्स आयडियाज, पहा बेस्ट पर्याय

Rahul Gandhi : हातात संविधान घेत राहुल गांधींची मोठी घोषणा, उद्या सर्वांना दिल्लीला बोलवलं, कारणही सांगितले

SCROLL FOR NEXT