PM Kisan Yojana Saam tv
बिझनेस

PM Kisan Yojana: पुढच्या महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये येणार? पीएम किसान योजनेबाबत महत्त्वाची अपडेट समोर

PM Kisan Yojana 23rd Installment Date: पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. पुढच्या महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यात पीएम किसानचा हप्ता जमा होऊ शकतो.

Siddhi Hande

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी

पुढच्या महिन्यात येणार पीएम किसानचा हप्ता

लवकरच घोषणा होण्याची शक्यता

देशातील कोट्यवधी शेतकरी पीएम किसान योजनेचा लाभ घेत आहेत. पीएम किसान योजनेअंतर्गत आतापर्यंत २२ हप्ते देण्यात आले आहेत. त्यानंतर आता २३वा हप्ता कधी देण्यात येणार असा प्रश्न विचारला जात आहे. दरम्यान, लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच पैसे जमा केला जाणार आहे.

पीएम किसान योजनेअंतर्गत वर्षभरात ६००० रुपये दिले जातात. दर ४ महिन्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी २००० रुपये जमा केले जातात. दरम्यान, आता मागचा २२ वा हप्ता १३ मार्च २०२६ रोजी जमा करण्यात आला होता. आसाममधील गुवाहाटी येथे एका कार्यक्रमात हा हप्ता देण्यात आला. त्यानंतर आता पुढचा २३वा हप्ता कधी येणार असा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात निर्माण झाला आहे.

या दिवशी खात्यात येऊ शकतात पैसे (PM Kisan Yojana 23rd Installment May Come on These Date)

पीएम किसान योजनेचा २२वा हप्ता जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्यात येण्याची अपेक्षा होती. मात्र, हा हप्ता पुढे ढकलण्यात आला. त्यानंतर आता हा हप्तादेखील पढे जाण्याची शक्यता आहे. जून किंवा जुलै महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे येऊ शकतात. त्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यात पुढच्या महिन्यात पैसे जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

पीएम किसानचा लाभ मिळवण्यासाठी हे काम आजच करा

पीएम किसान योजनेचा लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना ईकेवायसी करणे अनिवार्य आहे. याचसोबत आधार लिंक करणे गरजेचे आहे. जर तुम्ही केवायसी केले नाही तर तुमच्या खात्यात पैसे जमा होऊ शकत नाही. तुम्ही ऑनलाइन पद्धतीने केवायसी करायची आहे. याचसोबत तम्ही जवळच्या सीएससी केंद्रात जाऊनदेखील केवायसी करु शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

कॉलेज-कोचिंगचं साटलोटं, विद्यार्थ्यांची लूट, पुण्यात 'इंटिग्रेटेड'च्या नावाखाली काळाबाजार

Jalgaon Accident: महामार्गावर अपघाताचा थरार! जळगावमध्ये भरधाव कारची दुचाकीला धडक, चौघांचा जागीच मृत्यू

भाजपमध्ये मोठी फूट, प्रदेशाध्यक्ष, प्रदेश उपाध्यक्ष आणि सचिवांचा तडकाफडकी राजीनामा; देशाच्या राजकारणात खळबळ

Maharashtra News Live Update: नाशिक आणि जळगाव विधानपरिषदेचा तिढा सुटेल-श्रीकांत शिंदे

Skin Care: तुमची पण त्वचा खूप ऑयली आहे? मग या फेसमास्कमुळे चेहरा नॉर्मल होऊन मिळेल नॅचरल ग्लोईंग स्किन

SCROLL FOR NEXT