

पीएम किसान योजनेच्या हप्त्याबाबत अपडेट
२३वा हप्ता कधी येणार?
२३व्या हप्त्याआधी महत्त्वाची माहिती समोर
देशातील शेतकऱ्यांसाठी पीएम किसान योजना सुरु करण्यात आली आहे. पीएम किसान योजनेत दर वर्षी ६००० रुपये दिले जातात. पीएम किसान योजनेत आतापर्यंत २२ हप्ते देण्यात आले आहेत. यानंतर शेतकरी २३व्या हप्त्याची वाट पाहत आहेत. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या २३व्या हप्त्याआधीच महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर याबाबत माहिती देण्यात आली आहे.
कृषी मंत्रालयाद्वारे पीएम किसान सन्मान निधी योजना चालवली जाते. शिवराज चौहान हे कृषीमंत्री आहेत. त्यांनी या योजनेत अनेक महत्त्वाचे बदल केले आहेत. शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक निर्णय घेण्यात आले आहेत. दरम्यान, अजूनही २३व्या हप्त्याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
पीएम किसान योजनेच्या २३व्या हप्त्याआधी मोठी अपडेट (PM Kisan Yojana 23rd Installment Update)
पीएम किसान योजनेच्या अधिकृत हँडलवर पोस्ट करण्यात आली आहे. यामध्ये पीएम किसान योजनेत आतापर्यंत किती शेतकऱ्यांना लाभ मिळाला आहे, त्यांना किती पैसे देण्यात आले, याबाबत माहिती देण्यात आली आहे. पीएम किसानच्या एक्स हँडलवर माहिती दिली आहे. यामध्ये माहिती दिली आहे की, पीएम किसान योजनेत २२व्या हप्त्यासाठी ४,२८ लाख कोटी रुपयांची आर्थिक मदत केली जात आहे. यामध्ये महिला लाभार्थ्यांना १.१० लाख कोटींपेक्षा जास्त रक्कम देण्यात आली आहे. आता यापुढेही या शेतकऱ्यांना पीएम किसानचा लाभ देण्यात आला आहे.
कधी येणार २३वा हप्ता? (PM Kisan Yojana 23rd Installment Update)
पीएम किसान योजनेचा २३ वा हप्ता कधी येणार याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र, पीएम किसानचा हप्ता जून ते ऑगस्ट या कालावधीत कधीही दिला जाऊ शकतो. मागच्या वर्षी २ ऑगस्ट रोजी २०वा हप्ता देण्यात आला होता. त्याआधी १८ जून रोजी १८वा हप्ता दिला होता. त्यामुळे आता जून, जुलै किंवा ऑगस्ट या कालावधीत कधीही शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे येऊ शकतात.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.