PM Kisan Samman Nidhi Yojana saam tv
बिझनेस

PM Kisan Yojana: पीएम किसान योजनेत ₹२००० तुम्हाला मिळणार की नाही? अशा पद्धतीने चेक करा स्टेट्स

PM Kisan Yojana 22nd Installment Update: पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. पीएम किसान योजनेचा २२वा हप्ता फेब्रुवारी महिन्यात जमा होऊ शकतो. दरम्यान, पैसे तुम्हाला येणार की नाही, अशा पद्धतीने करा चेक.

Siddhi Hande

पीएम किसान योजनेबाबत अपडेट

पीएम किसान योजनेचा स्टेट्स कसा चेक करायचा?

लिस्टमध्ये तुमचं नाव आहे की नाही असं करा चेक

पीएम किसान योजनेत राज्यातील कोट्यवधी शेतकऱ्यांना लाभ मिळतो. शेतकऱ्यांना वर्षभरात ६००० रुपये दिले जातात. दरम्यान, या योजनेत आतापर्यंत २१ हप्ता देण्यात आला आहे. यानंतर शेतकरी २२व्या हप्त्याची वाट पाहत आहे. २२वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात पुढच्या महिन्यात येण्याची शक्यता आहे. दरम्यान, या योजनेत तुम्हाला पैसे मिळणार की नाही, यादीत तुमचं नाव आहे का हे ऑनलाइन पद्धतीने चेक करा.

पीएम किसान योजनेत दर ४ महिन्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा केले जातात. मागचा हप्ता नोव्हेंबर महिन्यात जमा केला होता. त्यानंतर आता २२वा हप्ता फेब्रुवारी महिन्यात जमा होण्याची शक्यता आहे. दरम्यान, तुम्हाला पैसे मिळणार की नाही हे तुम्ही ऑनलाइन पद्धतीने चेक करु शकतात.

पीएम किसान योजनेच्या लिस्टमध्ये नाव आहे की नाही असं करा चेक (PM Kisan Yojana List Name Check)

सर्वात आधी तुम्हाला पीएम किसान योजनेच्या pmkisan.gov.in या वेबसाइटवर जायचे आहे.

यानंतर तुम्हाला तिथे Beneficiary List वर क्लिक करायचे आहे.

यानंतर रिपोर्टवर क्लिक करा.

यानंतर तुमचे गाव सिलेक्ट करा. यानंतर तुम्हाला लाभार्थ्यांची यादी दिसेल. त्यातील तुमचे नाव शोधा.

पीएम किसान योजनेचा स्टेट्‍स कसा चेक करायचा? (PM Kisan Yojana Status Check)

सर्वात आधी pmkisan.gov.in यावर क्लिक करा.

यानंतर Know Your Status वर क्लिक करा.

यानंतर तुमचा रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे. यानंतर कॅप्चा कोड टाका.

यानंतर तुम्हाला ओटीपी येईल. त्यानंतर तुमची सर्व माहिती भरा. यानंतर स्टेट्‍स दिसेल. याचसोबत पुढचा हप्ता कधी येणार हेदेखील समजणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : नंदुरबार बाजार समितीत ओव्याची मोठी आवक

Crime News : घरगुती वाद टोकाला गेला, काकाने पुतण्याचा झोपेतच काटा काढला; बुलढाण्यातील धक्कादायक घटना

Skin Care : रोजच्या धावपळीत स्किन केअरकडे होतय दुर्लक्ष? मग 'ही' छोटीशी गोष्ट करा अन् चेहरा चमकवा

Anupam Kher: चेहरा वाकडा, बोलायला त्रास...; अनुपम खेर यांना झाला 'हा' आजार, त्यात मुलानेच वाजवली कानाखाली

Solapur Mayor Reservation : देशमुख, काळे की जाधव, सोलापूरचा महापौर कोण? भाजप धक्कातंत्र वापरणार, पाहा कुणाच्या नावाची चर्चा

SCROLL FOR NEXT