PM Kisan Yojana Saam Tv
बिझनेस

PM Kisan Yojana: ठरलं! फेब्रुवारी महिन्यात येणार पीएम किसानचे ₹२०००; त्याआधी हे काम कराच

PM Kisan Yojana 22nd Installment Update: पीएम किसन योजनेच्या लाभार्थ्यांना २२वा हप्ता लवकरच मिळणार आहे. फेब्रुवारी महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यात २००० रुपये जमा केले जाऊ शकतात.

Siddhi Hande

पीएम किसान योजनेच्या २२व्या हप्त्याबाबत अपडेट

फेब्रुवारी महिन्यात जमा होणार ₹२०००

पीएम किसानचा हप्ता मिळवण्यासाठी हे काम करा

भारतातील कोट्यवधी शेतकरी पीएम किसान योजनेचा लाभ घेत आहेत. पीएम किसान योजनेद्वारे शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम केले जातात. दरम्यान, पीएम किसान योजनेत आतापर्यंत २१ हप्ते जमा झाले आहेत. त्यानंतर आता २२व्या हप्त्याची प्रतिक्षा शेतकऱ्यांना आहे. आता शेतकऱ्यांना २२वा हप्ता पुढच्या महिन्यात दिला जाणार आहे. फेब्रुवारी महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यात २००० रुपये जमा केले जाणार आहेत.

पीएम किसान योजनेत दरवर्षी शेतकऱ्यांच्या खात्यात ६००० रुपये दमा केले जातात. दरम्यान, २००० रुपयांचे असे तीन हप्ते जमा केले जातात. याआधी लाडकी बहीण योजनेत शेवटचा हप्ता नोव्हेंबर महिन्यात दिला होता. त्यानंतर आता पुढचा हप्ता चार महिन्यांनी म्हणजेच फेब्रुवारीमध्ये येणार आहे.

हप्ता मिळवण्याआधी हे काम करा (PM Kisan Yojana KYC Update)

पीएम किसान योजनेचा हप्ता मिळवण्याआधी तुम्हाला केवायसी करणे अनिवार्य आहे. जर तुम्ही केवायसी केली नाही तर योजनेचा लाभ मिळणार नाहीत. काही वेळा ई केवायसी अर्धवट केल्यानंतर हप्ता थांबवला जाऊ शकतो. याचसोबत जमिनीचे व्हेरिफिकेशन करणेदेखील गरजेचे आहे. अन्यथा तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार आहे.

दरम्यान, काही राज्यांमध्ये फार्मर आयडी (Farmer ID) असणे अनिवार्य आहे. जर तुमच्याकडे फार्मर आयडी नसेल तर योजनेचा लाभ मिळत नाही. याचसोबत बँक खाते आणि आधार नंबर लिंक असणे गरजेचे आहे. जर यामध्ये कोणती अडचण असेल तर हप्ता मिळणार आहे. तुम्ही केवायसी वेबसाइटवरुन करु शकतात. याचसोबत तुम्हाला पैसे मिळणार की नाही याचा स्टेट्‍स चेक करु शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manoj Jarange Patil: ...तर सरकारचा माज उतरवलाच पाहिजे; मनोज जरांगे पाटील कडाडले

Uddhav Thackeray: राजीनाम्यानं चालणार नाही, तर सरकार बदला; जंतर मंतरवरून उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

कार अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू; दुचाकीस्वाराला वाचवताना अनर्थ घडला!

राहुल-प्रियंका गांधींना 3 तासांनी पोलिसांनी सोडलं; सुटकेनंतरचा पहिला व्हिडिओ

Fact Check: देशातल्या पहिल्या हायड्रोजन ट्रेनवर दगडफेक? CJP समर्थकांकडून हायड्रोजन ट्रेन टार्गेट?

SCROLL FOR NEXT