PM Kisan Yojana Saam Tv
बिझनेस

PM Kisan Yojana: आज ९ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात ₹२००० जमा होणार; तुम्हाला येणार की नाही? अशा पद्धतीने करा चेक

PM Kisan Yojana 21st Installment Come Today: पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आज पीएम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा केले जाणार आहेत.

Siddhi Hande

पीएम किसान योजनेचा हप्ता आज होणार जमा

आज शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी २००० रुपये येणार

तुम्हाला पैसे येणार की नाही? अशा पद्धतीने करा चेक

देशातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. शेतकऱ्यांच्या खात्यात आज पीएम किसान योजनेचा हप्ता जमा होणार आहे. आज लाभार्थी शेतकऱ्यांना प्रत्येकी २००० रुपये देण्यात येणार आहे. केंद्र सरकारने १४ नोव्हेंबर रोजी याबाबत घोषणा केली होती.

पीएम किसानचा हप्ता कधी जमा होणार? (PM Kisan Yojana Installment Recieve Today)

पीएम किसान योजनेअंतर्गत तब्बल ९ कोटी शेतकऱ्यांना पैसे देण्यात येणार आहे. आज दुपारी २ वाजता हा हप्ता वितरीत केला जाणार आहे. त्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे. दरम्यान, या योजनेत ९ कोटींपेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा केले जाणार आहे.

तुम्हाला पैसे येणार की नाही?

पीएम किसान योजनेचा हप्ता मिळवण्यासाठी प्रत्येक लाभार्थी शेतकऱ्याला केवायसी करणे अनिवार्य आहे. जर तुम्ही केवायसी केले नाही तर तुम्हाला योजनेचा लाभ लाभ मिळणार नाही. दरम्यान, यावेळी लाखो शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळणार आहे. सरकारने योजनेअंतर्गत पडताळणी सुरु केली होती. यामध्ये अनेक शेतकऱ्यांच्या कागदपत्रांमध्ये काही त्रुटी असल्याचे लक्षात आले आहेत. त्यामुळे लाखो शेतकऱ्यांचे लाभ बंद करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे.

तुम्हाला पैसे आले की नाही? अशा पद्धतीने चेक करा

शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाल्यावर तुम्हाला त्याचा मेसेज येणार आहे. याचसोबत तुम्ही ऑनलाइन बँकिंग अॅपवर जाऊन पैसे आले की नाही हे चेक करु शकतात.याचसोबत तुम्ही बँकेत जाऊनदेखील पैसे आले की नाही याची एन्ट्री पासबुकवर करु शकतात. याचसोबत तुम्हाला पैसे येणार की नाही याचा स्टेट्‍स तुम्ही चेक करु शकतात. त्यावरुन तुम्हाला आज पैसे येणार की नाही हे समजणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुण्यात संध्याकाळी सात नंतर पेट्रोल पंप राहणार बंद

Eknath Shinde News : ठाणेकरांसाठी आनंदवार्ता! सरकारकडून मुद्रांक शुल्कात मोठी सवलत, एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा

Pune Petrol Pump: पुणेकरांची महत्वाची बातमी! यापुढे संध्याकाळी ७ नंतर पेट्रोल पंप राहणार बंद; नेमकं कारण काय?

Skin Cancer: त्वचेवर ही लक्षणं दिसताच डॉक्टरांकडे धाव घ्या; स्किन कॅन्सरचे संकेत असू शकतात

Kombadgad : महाराष्ट्रातील 'कोंबडगड' पाहिलात का? ट्रेकिंगसाठी सर्वात बेस्ट

SCROLL FOR NEXT