PM Kisan Yojana Saam Tv
बिझनेस

PM Kisan Yojana: शेतकर्‍यांच्या कामाची बातमी! कोणत्याही क्षणी खात्यात ₹२००० येणार; पण त्याआधी हे काम कराच

PM Kisan Yojana 21st Installment Update: पीएम किसान योजनेत २१वा हप्ता कधी येणार असा प्रश्न विचारला जात आहे. दरम्यान, पीएम किसान योजनेचा हप्ता मिळवण्यासाठी तुम्ही हे काम करा.

Siddhi Hande

पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी

पीएम किसान योजनेत २१वा हप्ता कधी येणार?

पीएम किसान योजनेत पैसे मिळण्यासाठी हे काम करा

देशातील जवळपास १० कोटी शेतकरी पीएम किसान योजनेचा लाभ घेत आहेत. पीएम किसान योजनेत तुम्हाला दरवर्षी ६००० रुपये मिळतात. तीन हप्त्यांमध्ये हे पैसे दिले जातात. दरम्यान, आता शेतकरी २१व्या हप्त्याची वाट पाहत आहेत. ऑक्टोबर महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होण्याची शक्यता होती. मात्र, आता हा हप्ता लांबणीवर गेला आहे. दरम्यान, कधीही शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे येऊ शकतात. परंतु त्याआधी तुम्हाला हे काम करायचे आहे.

हे काम करा अन्यथा मिळणार नाही पीएम किसानचा हप्ता (PM Kisan Yojana Do These Work Otherwise wont Get Installment)

पीएम किसान योजनेचा हप्ता मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना केवायसी करणे अनिवार्य आहे. शेतकऱ्यांनी जर केवायसी केली नाही तर त्यांना योजनेअंतर्गत लाभ मिळणार नाहीये. तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने केवायसी करायची आहे. याचसोबत CSC सेंटरमध्ये जाऊनदेखील तुम्ही केवायसी करु शकतात.

या शेतकऱ्यांना मिळणार लाभ

ज्या शेतकऱ्यांना मागचा हप्ता मिळाला आहे त्या सर्व शेतकऱ्यांना हा हप्तादेखील मिळणार आहे. परंतु त्यासाठी तुम्हाला सर्वात आधी केवायसी करायची आहे. याचसोबत तुमचे नाव लिस्टमध्ये आहे की नाही हे चेक करा. जेणेकरुन तुम्हाला लाभ मिळणार की नाही हे समजेल.

केवायसी कशी करायची? (PM Kisan Yojana KYC Process)

पीएम किसान योजनेत केवायसीसाठी सर्वात आधी अधिकृत वेबसाइटवर जा.

यानंतर फार्मर्स कॉर्नरवर क्लिक करा.

यानंतर तुम्हाला केवायसी ऑप्शनवर क्लिक करा.

यानंतर तुमचा फोन नंबर आणि आवश्यक माहिती

टाका. तुमच्या फोन नंबरवर ओटीपी येईल.

हा ओटीपी तुम्हाला टाकल्यानंतर केवायसी प्रोसेस पूर्ण होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Banarasi Saree Design: बनारसी साड्यांचे एका पेक्षा एक डिझाईन्स, हे 5 पॅटर्न नक्की ट्राय करा

Iran-US War: अमेरिका- इराणची अणुब़ॉम्ब चाचणी? जग अणु युद्धाच्या छायेत?

इस्त्रायल आणि इराणमध्ये कोण आहे बलवान? इराणच्या व्हिडिओनं अमेरिका आणि इस्त्रायलची झोप उडवली| Video

लव्ह मॅरेजनंतर तातडीनं घटस्फोट; पुण्यातील महिलेने पतीला दिले 50 हजार

Iran vs Israel America War : इराण होणार बेचिराख? अमेरिकेनं उघडला तिसरा डोळा, VIDEO

SCROLL FOR NEXT