Jaggery Benefits: साखरेपेक्षा गुळ खाण्याचा सल्ला डॉक्टर का देतात? गुळामुळे शरिरात काय बदल होतात?

Shruti Vilas Kadam

गुळात नैसर्गिक पोषक घटक असतात

साखरेच्या तुलनेत गुळात लोह, कॅल्शियम, पोटॅशियम आणि मॅग्नेशियमसारखे खनिज घटक आढळतात, जे शरीरासाठी फायदेशीर ठरतात.

Benefits Jaggery | Canva

पचनक्रिया सुधारण्यास मदत होते

जेवणानंतर थोडा गूळ खाल्ल्याने पचन चांगले होते. त्यामुळे गॅस, अॅसिडिटी आणि बद्धकोष्ठतेची समस्या कमी होण्यास मदत मिळते.

Benefits Jaggery | Canva

रक्तातील हिमोग्लोबिन वाढवण्यास उपयोगी

गुळात लोहाचे प्रमाण असल्याने शरीरातील रक्तनिर्मिती सुधारण्यास मदत होते. त्यामुळे अशक्तपणा कमी होऊ शकतो.

jaggery benefits | freepik

शरीराला नैसर्गिक ऊर्जा मिळते

गूळ शरीरात हळूहळू ऊर्जा निर्माण करतो. त्यामुळे अचानक साखर वाढण्याऐवजी शरीर अधिक काळ सक्रिय राहते.

Benefits Jaggery | Canva

रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते

गुळातील अँटीऑक्सिडंट्स आणि खनिजे शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात. त्यामुळे हंगामी आजारांपासून संरक्षण मिळू शकते.

Benefits Jaggery | Canva

शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत

गूळ शरीर डिटॉक्स करण्यास मदत करतो असे मानले जाते. विशेषतः यकृत स्वच्छ ठेवण्यासाठी तो उपयुक्त मानला जातो.

Jaggery Benefits | Yandex

श्वसनासंबंधित समस्यांमध्ये आराम मिळू शकतो

गूळ आणि तूप किंवा आले एकत्र खाल्ल्यास घसा खवखवणे, सर्दी आणि खोकल्यामध्ये आराम मिळण्यास मदत होते.

Health | Saam Tv

Tea-Coffee Avoid: चहा-कॉफी १५ दिवस बंद केल्यावर शरिरात होतात हे फायदेशीर बदल, डाइटपेक्षा हा बदल नक्की करा

Tea Or Coffee | yandex
येथे क्लिक करा