Tea-Coffee Avoid: चहा-कॉफी १५ दिवस बंद केल्यावर शरिरात होतात हे फायदेशीर बदल, डाइटपेक्षा हा बदल नक्की करा

Shruti Vilas Kadam

झोपेची गुणवत्ता सुधारते

चहा आणि कॉफीमधील कॅफिनमुळे झोपेवर परिणाम होतो. १५ दिवस हे पेय बंद केल्यावर गाढ आणि शांत झोप लागण्यास मदत होते.

Tea Or Coffee | yandex

पचनक्रिया अधिक चांगली होते

अतिरिक्त चहा-कॉफीमुळे अॅसिडिटी आणि पोटातील जळजळ वाढू शकते. हे पेय टाळल्यावर पचन सुधारते आणि पोट हलके वाटते.

Tea Coffee | Yandex

शरीरातील ऊर्जा नैसर्गिकरित्या वाढते

कॅफिनवर अवलंबून राहण्याऐवजी शरीर स्वतः ऊर्जा निर्माण करू लागते. त्यामुळे दिवसभर ताजेतवाने वाटू शकते.

Tea Or Coffee Bubbles | saam tv

त्वचेमध्ये नैसर्गिक चमक येते

जास्त कॅफिनमुळे त्वचा कोरडी होऊ शकते. चहा-कॉफी कमी केल्यावर शरीरातील पाण्याचे प्रमाण संतुलित राहते आणि त्वचा अधिक निरोगी दिसते.

tea and coffee | saam tv

तणाव आणि अस्वस्थपणा कमी होऊ शकते

कॅफिनमुळे काही लोकांना चिंता, चिडचिड किंवा हृदयाचे ठोके वाढल्यासारखे वाटते. १५ दिवस ब्रेक घेतल्यावर मन शांत राहण्यास मदत होते.

coffee | yandex

दातांवरील डाग कमी होतात

चहा आणि कॉफीमुळे दात पिवळे पडण्याची शक्यता असते. हे पेय टाळल्यास दात अधिक स्वच्छ आणि चमकदार दिसू शकतात.

Tea

डोकेदुखी आणि थकवा सुरुवातीला जाणवू शकतो

कॅफिन अचानक बंद केल्यावर काही दिवस डोकेदुखी किंवा थकवा जाणवू शकतो. मात्र काही दिवसांनी शरीर नव्या सवयीशी जुळवून घेते.

Tea-Coffee

Salt Bath Benefits: मिठाच्या पाण्याने अंघोळ करण्याचे फायदे कोणते? त्वचा आणि शरीराला मिळतात अनेक लाभ

Salt Bath Benefits | saam Tv
येथे क्लिक करा