PM Kisan Yojana Saam Tv
बिझनेस

PM Kisan Yojana: शेतकऱ्यांना लवकरच मिळणार खुशखबर! या दिवशी खात्यावर येणार ₹२०००

PM Kisan Yojana 21st Insatllment: पीएम किसान योजनेच्या २१व्या हप्त्याची शेतकरी आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान, लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा केले जाऊ शकतात.

Siddhi Hande

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी

पीएम किसानचा २१वा हप्ता कधी येणार?

नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात पैसे येण्याची शक्यता

पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. पीएम किसान योजनेच्या लाभार्थी २१व्या हप्त्याची वाट पाहत आहेत. ऑक्टोबर महिन्यात पीएम किसान योजनेचा हप्ता येण्याची शक्यता होती. मात्र, हा हप्ता लांबणीवर गेला आहे. दरम्यान, या महिन्यात पैसे येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अजूनही केंद्र सरकारने याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.

मिडिया रिपोर्टनुसार, नरेंद्र मोदी नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पैसे देऊ शकता. बिहार विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. या निवडणुका पुढच्या आठवड्यात होणार आहेत. त्यामुळे त्याआधी महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जाऊ शकतात.

निवडणुकीच्या काळात आचारसंहिता लागू झाल्यावर कोणत्याही सरकारी योजनेत निधी दिला जात नाही. त्यामुळेच कदाचित पैसे पुढच्या आठवड्यात येऊ शकतात. याबाबत लवकरच अधिकृतपणे घोषणा केली जाईल.

पीएम किसान (PM Kisan Yojana) ही सरकारची सर्वात महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेत दरवर्षी शेतकऱ्यांच्या खात्यात ६००० रुपये जमा केले जातात. दर चार महिन्यांनी प्रत्येकी २००० रुपये दिले जातात. दरम्यान, आतापर्यंत २० हप्ते देण्यात आले आहेत. पुढील हप्ता लवकरच दिला जाईल.

३ राज्यातील शेतकऱ्यांना आधीच दिले पैसे

सरकारने तीन राज्यातील शेतकऱ्यांना आधीच पैसे दिले आहेत. हिमाचल प्रदेश, पंजाब आणि उत्तराखंडमधील शेतकऱ्यांना आधीच २१वा हप्ता दिला आहे. या राज्यांमध्ये पुरपरिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे शेतकऱ्यांचे खूप नुकसान झाले होते. त्यामुळेच सरकारने यांना पैसे दिले. जम्मू काश्मीरमधील शेतकऱ्यांनाही पैसे देण्यात आले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today : आजही सोन्याचे दरात मोठी घसरण, प्रति तोळा 'इतक्या' रूपयांवर घसरलं, वाचा 24, 22 आणि 18k ताजे दर

Fertility Problems: करिअरच्या नादात मोठी चूक? नोकरी करणारे ६०% कपल्स प्रजननाच्या आरोग्य तपासणीकडे फिरवतात पाठ

EPFOमध्ये बँक अकाउंट अपडेट कसं करायचं? वाचा स्टेप बाय स्टेप प्रोसेस

Akola : एका लग्नाची अजब गोष्ट! सोशल मीडियावर जुळल्या रेशीमगाठी, साडेतीन फूट नवरदेव आणि तीन फूट नवरीच्या लग्नाची सर्वत्र चर्चा

Bigg Boss Marathi 6 Video : रुचितावरच्या प्रेमाची विशालने दिली कबुली, नेटकरी म्हणतात- "वयातील अंतर तरी पाहा..."

SCROLL FOR NEXT