PM Kisan Yojana Saam Tv
बिझनेस

PM Kisan Yojana: पीएम किसान योजनेचा २०वा हप्ता कधी येणार? समोर आली तारीख

PM Kisan Yojana 20th Installment Date: पीएम किसान योजनेचा २०वा हप्ता कधी येणार याकडे सर्वांचेच लक्ष आहे. २०वा हप्ता २० जून रोजी मिळण्याची शक्यता आहे.

Siddhi Hande

भारत देश हा कृषीप्रधान आहे. देशात कोट्यवधि लोक शेती व्यवसायावर अवलंबून आहेत. शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नावर त्यांचे घर चालते. याच शेतकऱ्यांना मदत मिळावी, यासाठी सरकारने काही योजना सुरु केल्या आहेत. केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी पीएम किसान सन्मान निधी योजना सुरु केली आहे. या योजनेत शेतकऱ्यांना वर्षभरात ६००० रुपये मिळतात. दरम्यान, या योजनेचा पुढचा हप्ता कधी देणार त्याची तारीख समोर आली आहे.

पीएम किसान योजनेचा २० वा हप्ता (PM Kisan Yojana 20th Installment Date)

पीएम किसान योजनेत आतापर्यंत १९ हप्ते जमा करण्यात आले आहेत. त्यानंतर आता शेतकऱ्यांना २० व्या हप्त्याची प्रतिक्षा आहे. मिडिया रिपोर्टनुसार, शेतकऱ्यांना २० जून रोजी हप्ता मिळणार आहे. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

पीएम किसान योजना (PM Kisan Yojana)

पीएम किसान योजनेत दर चार महिन्यांनी २००० रुपये शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये जमा केले जातात. याचा पहिला हप्ता एप्रिल ते जुलै महिन्यासाठी असतो. त्यानंतर ऑगस्ट ते नोव्हेंबर आणि डिसेंबर ते मार्च या तीन टप्प्यांमध्ये पैसे मिळतात.

योजनेचा लाभ कोणाला मिळतो?

पीएम किसान योजनेचा लाभ भारतातील शेतकऱ्यांना मिळतो. ज्यांच्याकडे जमी आहे. या योजनेचा लाभ घेताना बँक अकाउंट आणि आधार कार्ड लिंक असावे. याचसोबत केवायसी प्रोसेस पूर्ण केलेली असावी. जर तुम्ही केवायसी केले नाही तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

अस्थिविसर्जनानंतर अवघ्या 24 तासांत सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री; दिवसभरात राजकीय चक्रे कशी फिरली?

उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच सुनेत्रा पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, 'अजितदादांच्या विचारांचा वारसा...'

IND vs NZ T20: इशान किशनकडून किवींच्या गोलंदाजांची धुलाई, ४२ चेंडूत ठोकलं शतक

Maharashtra Live News Update: छत्रपती संभाजीनगरमध्ये कारने घेतला अचानक पेट

राज्यात पवार नावाचं वलय कायम ठेवायचं असेल तर..., सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच मनोज जरांगेंचं मोठं विधान

SCROLL FOR NEXT