PM Kisan Yojana Saam Tv
बिझनेस

PM Kisan Yojana: तारीख ठरली! 'या' दिवशी येणार पीएम किसान योजनेचा पुढचा हप्ता; या शेतकऱ्यांना मिळणार नाही लाभ

PM Kisan Sanman Nidhi Yojana Next Installment: केंद्र सरकारच्या पीएम किसान सन्मान निधी योजनेचा १९वा हप्ता फेब्रुवारी महिन्यात देण्यात येणार आहे. या योजनेचा हप्ता कधी येणार याची तारीख आता समोर आली आहे.

Siddhi Hande

केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी खास पीएम किसान सन्मान निधी योजना राबवली आहे. पीएम किसान सन्मान निधी योजनेत शेतकऱ्यांना वर्षभरात ३ हप्ते दिले जातात. प्रत्येक हप्त्यात दोन-दोन हजार रुपये दिले जातात. या योजनेबाबत नवीन अपडेट समोर आली आहे. या योजनेचा १९ वा हप्ता कधी येणार त्याची तारीख समोर आली आहे. (PM Kisan Sanman Nidhi Yojana)

पीएम किसान सन्मान निधी योजनेत दर चार महिन्यांनी पैसे दिले जातात. याआधीचा १८वा हप्ता ऑक्टोबर महिन्यात देण्यात आला होता. त्यानंतर १९वा हप्ता फेब्रुवारी महिन्यात येईल, अशी आशा होती. दरम्यान, या योजनेच्या हप्त्याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी २४ फेब्रुवारी रोजी बिहार दौऱ्यावर असणार आहे. याच दिवशी पीएम किसान सन्मान निधीचा १९वा हप्ता दिला जाऊ शकतो. या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात २-२ हजार रुपये ट्रान्सफर केले जातील. या योजनेबाबत अधिकृत वेबसाइटवर लवकरच माहिती देण्यात येईल.

या शेतकऱ्यांना मिळणार नाही पुढचा हप्ता (These Farmers Will Not get Next Installment)

पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी केवायसी करणे गरजेचे आहे. ज्या शेतकऱ्यांचे केवायसी झाले नाही त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.त्यामुळे शेतकऱ्यांनी लवकरात लवकर केवायसी करावे.

पीएम किसान योजनेचे केवायसी कसं करायचं? (How To KYC Under PM Kisan Sanman Nidhi Yojana)

केवायसी करण्यासाठी सर्वप्रथम तुम्ही पीएम किसान सन्मान निधीच्या अधिकृत वेबसाइटवर जावे.

यानंतर फार्मर्स कॉनर्स या सेक्शनवर क्लिक करा. त्यानंतर केवायसी पर्यायावर क्लिक करा.

यानंतर तुमचा आधार नंबर आणि रजिस्टर मोबाईल नंबर टाका. त्यानंतर मोबाईलवर आलेला ओटीपी टाका. तुमची केवायसी प्रक्रिया पूर्ण होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

HBD Sanjay Dutt : बॉलिवूडचा मुन्नाभाई किती कोटींचा मालक?

Dharashiv Crime : बँकेची लोखंडी खिडकी तोडून चोरट्यांचा आत प्रवेश; दरोड्याचा प्रयत्न फसला

Sangali Nag Panchami : सांगलीकरांची २३ वर्षांची प्रतीक्षा संपली, जिवंत नाग पकडण्याला परवानगी, नेमकं प्रकरण काय?

Honey Trap : नाशिकनंतर सांगलीतही हनी ट्रॅप, २ माजी मंत्र्यांचा सहभाग, खडसेंचा खळबळजनक दावा

Maharashtra Live News Update : माणिकराव कोकाटे अजित पवारांच्या भेटीसाठी रवाना, राजीनामा देणार का?

SCROLL FOR NEXT