PM Kisan Yojana Saam Tv
बिझनेस

PM Kisan Yojana: चुकूनही करु नका ही ३ कामे, अन्यथा पीएम किसान योजनेचे ६००० रुपये विसरा

PM Kisan Sanman Nidhi Yojana: केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी पीएम किसान सन्मान निधी योजना राबवली आहे. या योजनेत शेतकऱ्यांना ६००० रुपये दिले जातात.

Siddhi Hande

केंद्र सरकारने नागरिकांसाठी अनेक योजना राबवल्या आहेत. यातील अनेक योजना या महिलांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी आहेत.केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी पीएम किसान योजना राबवली आहे. या योजनेत शेतकऱ्यांना वर्षाला ६००० रुपये दिले जातात. या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही नियमांचे पालन करावे लागते. जर तुम्ही या नियमांचे पालन केले नाही तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत. (PM Kisan Sanman Nidhi Yojana)

शेतकऱ्यांना आर्थिक मदत व्हावी, या उद्देशाने ही योजना राबवण्यात आली आहे.या योजनेअंतर्गत ३ हप्त्यांमध्ये पैसे दिले जातात. प्रत्येक हप्त्यात २००० रुपये दिले जातात. भारत सरकारने २०१९ मध्ये ही योजना सुरु केली होती.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना आपल्या बँक खात्यात डीबीटी म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर ऑन करणे गरजेचे आहे.याच माध्यमातून सरकार तुम्हाला पैसे पाठवते.

याचसोबत जर तुम्ही अर्ज करताना काही चुकीची माहिती भरली असेल तर तुमचा अर्ज रिजेक्ट होऊ शकतो. त्यामुळेदेखील तुमचे पैसे अटकू शकतात. पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी ई-केवायस करणे खूप गरजेचे आहे. तुम्ही ई-केवायसी पूर्ण केल्यानंतरच तुम्हाला पैसे मिळणार आहे. ई-केवायसी म्हणजे तुमच्या माहितीची पुन्हा तपासणी करणे.जर तुम्ही ई-केवायसी केले नसेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत. (PM Kisan Yojana)

पीएम किसान सन्मान निधी योजनेचा १३ कोटींपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी लाभ घेतला आहे. या योजनेत आतापर्यंत १८ हप्ते देण्यात आले आहेत. फेब्रुवारी महिन्यात पुढचा हप्ता दिला जाईल.या योजनेचा लाभ घेण्यासाठी ही तीन कामे करणे खूप गरजेचे आहे. अन्यथा तुम्हाला लाभ मिळणार नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : सोलापुरात सापडला भारतातील सर्वात मोठा दगडी चक्रव्यूह

Shirala Chutney Recipe : शिराळ्याची चटणी कधी खाल्ली आहात का? हिवाळ्यात जेवणासोबत तोंडी लावायला उत्तम

Pune : पुण्यात शरद पवारांना जबरी धक्का, आमदाराचा मुलगा भाजपात प्रवेश करणार, २२ नेते आज कमळ हातात घेणार

Marathi Actress : प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचे बॉलिवूडमध्ये पदार्पण, आमिर खानच्या सिनेमात वर्णी

Navi Mumbai: नवी मुंबईत भाजपचा स्वबळाचा नारा? महापौर आमचाच होणार, गणेश नाईकांचा दावा

SCROLL FOR NEXT