PM Kisan Yojana Saam Tv
बिझनेस

PM Kisan Yojana: PM किसान योजनेचा १८ हप्ता पुढच्या महिन्यात; हे काम आताच करा, अन्यथा आर्थिक फटका बसणार, जाणून घ्या

Siddhi Hande

भारत सरकारने नागरिकांसाठी अनेक योजना राबवल्या आहेत. यातील एक योजना म्हणजे पीएम किसान सन्मान निधी योजना. पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी ६००० रुपये दिले जातात. वर्षभरात ३ वेळा हप्ता दिला जातो. शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी ही मदत केली जाते.या योजनेचा पुढचा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या अकाउंटला जमा होणार आहे.

पीएम किसान सन्मान निधी योजना २०२८ मध्ये राबवण्यात आली आहे. या योजनेत आतापर्यंत १७ हप्ते शेतकऱ्यांना देण्यात आले आहे. त्यानंतर आता १८वा हप्त्याची शेतकरी आतुरतेने वाट पाहत आहेत. ऑक्टोबर महिन्यात हा हप्ता शेतकऱ्यांना मिळणार आहे. मात्र, काही शेतकऱ्यांना हा हप्ता मिळणार आहे. (PM Kisan Yojana)

पीएम किसान योजनेअंतर्गत ऑक्टोबर महिन्यात १८वा हप्ता मिळणार आहे. या योजनेत १२ कोटी शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे. या योजनेबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. सरकारने शेतकऱ्यांना ई-केवायसी करण्याचे निर्देश जारी केले आहे.

पीएम किसान सन्मान योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी केलं नाही त्यांना हा हप्ता मिळणार नाही.त्यामुळे शेतकऱ्यांनी लवकरात लवकर ई-केवायसी करावे. (PM Kisan Sanman Nidhi Yojana)

ई केवायसी प्रोसेस (PM Kisan EKyc Process)

ई केवायसी करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम योजनेच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल. त्यानंतर Farmers Corner वर क्लिक करा. यानंतर तुमचा आधार नंबर, मोबाईल नंबर टाकावा. त्यानंतर तुम्हाला ओटीपी येईल. तो ओटीपी टाकून तुम्ही फॉर्म सबमिट करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Richest Marathi Actress: मराठी चित्रपटातल्या श्रीमंत सिनेतारका; सर्वाधिक मालमत्ता कोणाची?

Ladki Bahin Yojana : सप्टेंबरमध्ये अर्ज केलेल्या महिलांच्या खात्यात किती पैसे येणार? महत्वाची अपटेड समोर

Maharashtra News Live Updates: - इम्तियाज जलील यांच्या तिरंगा रॅलीमुळे मुंबई नाशिक महामार्गावर वाहतूक ठप्प

Bharatshet Gogawale: अखेर भरत गोगावले अध्यक्ष बनले एसटीचे अध्यक्ष, 2 दिवसांच्या नाराजीनंतर स्वीकारला पदभार

Rajgad Fort : इतिहासाची उजळणी करायचीय? फक्त 'या' ठिकाणाला द्या भेट

SCROLL FOR NEXT