पीएम किसान योजनेचा २०वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे.
आतापर्यंत १९ हप्त्यांचा लाभ देशभरातील शेतकऱ्यांना मिळालाय.
केवायसी प्रक्रिया पूर्ण असलेल्यांनाच २०वा हप्ता मिळणार आहे.
अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी pmkisan.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी.
पीएम किसान योजनेच्या अंतर्गत कोट्यवधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दरवर्षी ६ हजार रुपये पाठवले जातात. ही रक्कम थेट तीन समान हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांच्या बॅक खात्यात पाठवली जाते. केंद्र सरकारने या योजनेच्या अंतर्गत आतापर्यंत १९ हप्ते पाठवण्यात आले आहेत. देशातील शेतकरी आता पुढच्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. जून महिन्यात २० वा हप्ता येणार होता, परंतु याबाबत अजून कोणतीच माहिती सरकारकडून देण्यात आली नाहीये. (PM-Kisan Samman Nidhi: 20th Installment Release Date, Eligibility and Updates)
सरकारने १९ वा हप्ता २४ फेब्रुवारी २०२५ रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात हस्तांतरित केला. त्यापूर्वी,१७ वा हप्ता १८ जून २०२४ रोजी आला. आता २० वा हप्ता जून २०२५ मध्ये येईल,अशी अपेक्षा होती, परंतु जुलै महिना होत आलाय तरी हप्त्याबाबत कोणतीही अपडेट आलेले नाही. १८ जुलै रोजी शेतकऱ्यांना २००० रुपयांचा हप्ता मिळण्याची अपेक्षा होती. पण अजून शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे आले नाहीत. दरम्यान सरकार लवकरच त्याबाबत नवीन माहिती देणार असल्याचं सांगितले जात आहे.
पीएम किसान pmkisan.gov.in च्या अधिकृत वेबसाइटवर जा.
होमपेजवरील 'पेमेंट सक्सेस' विभागाच्या खाली असलेल्या पिवळ्या 'डॅशबोर्ड' बटणावर क्लिक करा.
आता व्हिलेज डॅशबोर्ड उघडेल. त्यात राज्य, जिल्हा, उपजिल्हा आणि पंचायतीची माहिती भरावी.
यानंतर 'रिपोर्ट मिळवा' वर क्लिक करा आणि तुमचे नाव लाभार्थी यादीत आहे की नाही ते पहावे.
ई-केवायसी पूर्ण झाले आहे आणि बँक खाते आधारशी जोडलेले आहे त्यांनाच पैसे मिळतील. नोंदणीनंतरही जर कागदपत्रे अपूर्ण असतील तर पैसे येणार नाहीत. तर खासदार, आमदार, मंत्री किंवा नगरपालिकेचे अध्यक्ष असे कोणतेही घटनात्मक पद भूषविणाऱ्या शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळत नाही. जे शेतकरी आयकर भरतात, त्यांनाही पैसे मिळणार नाहीत. कोणत्याही संस्थात्मक जमिनीचे धारक शेतकरी देखील याचा लाभ घेऊ शकत नाहीत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.