PM Kisan Mandhan Yojana saam tv
बिझनेस

PM Kisan Mandhan Yojana : शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! पती-पत्नीला मिळणार दरमहा 6,000 रुपये पेन्शन; असा करा अर्ज

Farmer Pension : प्रधानमंत्री किसान मानधन योजनेत पात्र शेतकऱ्यांना वयाची ६० वर्षे पूर्ण झाल्यावर दरमहा पेन्शन मिळते.

Sakshi Sunil Jadhav

दुष्काळाने त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. सरकारने महत्त्वाची योजना सुरू केली आहे. या योजनेचं नाव प्रधानमंत्री किसान मानधन योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र शेतकऱ्यांना वयाची ६० वर्षे पूर्ण झाल्यावर दरमहिन्याला ३००० रुपये पेन्शन दिली जाते. यात जर नवरा आणि बायको दोघांनाही या योजनेसाठी पात्र ठरले तर त्यांना मिळून दर महिन्याची ६००० रुपये पेन्शन मिळू शकते. म्हातारपणात शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळावा आणि दैनंदिन खर्चासाठी दुसऱ्यांवर अवलंबून राहावं लागू नये, हा या योजनेमागचा उद्देश आहे.

प्रधानमंत्री किसान मानधन योजनेत किती पेन्शन मिळते?

शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत वयाची ६० वर्षे पूर्ण झाल्यानंतर दरमहिन्याला ३००० रुपये दिले जातात. म्हणजेच वर्षाला ३६००० रुपये पेन्शन मिळते. नवरा-बायको दोघांनी स्वतंत्रपणे योजनेत सहभाग घेतला आणि ते पात्र ठरले, तर दोघांना मिळून वर्षाला ७२,००० रुपये मिळू शकतात. या योजनेसाठी शेतकऱ्याला वयानुसार दरमहा ५५ ते २०० रुपयांपर्यंत योगदान द्यावं लागतं. विशेष म्हणजे, शेतकरी जेवढी रक्कम जमा करतो, तेवढीच रक्कम केंद्र सरकारकडूनही जमा केली जाते.

योजनेसाठी पात्रता काय आहे?

प्रधानमंत्री किसान मानधन योजनेचा लाभ घेण्यासाठी काही अटी पूर्ण करणं आवश्यक आहे.

अर्जदार शेतकऱ्याचे वय १८ ते ४० वर्षांच्या दरम्यान असावे.

शेतकरी अल्पभूधारक किंवा सीमांत शेतकरी असला पाहिजे.

शेतकऱ्याकडे जास्तीत जास्त २ हेक्टरपर्यंत लागवडीयोग्य जमीन असावी.

वयाच्या ६० वर्षांपर्यंत दरमहा नियमित हप्ता भरणं गरजेचं आहे.

अर्ज कसा करायचा?

जर शेतकऱ्यांना या योजनेत सहभागी व्हायचं असेल तर शेतकऱ्यांना जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटर (CSC) किंवा महा ई-सेवा केंद्रात जाऊन नोंदणी करता येते. तसेच ऑनलाइन पोर्टलवरूनही अर्ज करण्याचा पर्याय उपलब्ध आहे.

नोंदणीसाठी पुढील कागदपत्रे आवश्यक आहेत.

आधार कार्ड

बँक पासबुक किंवा बँक खात्याचा तपशील

वयाचा दाखला

जमिनीशी संबंधित कागदपत्रे

नोंदणी पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्याच्या वयानुसार मासिक हप्त्याची रक्कम निश्चित केली जाते. त्यानुसार दरमहा योगदान जमा करावे लागते.

वृद्धापकाळात मिळणार आर्थिक आधार

शेतीतून मिळणारे उत्पन्न बऱ्याचदा अनिश्चित असतं. अशा परिस्थितीत म्हातारपणात नियमित उत्पन्न मिळणं शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचं ठरतं. प्रधानमंत्री किसान योजनेमुळे पात्र शेतकऱ्यांना दरमहा ठराविक पेन्शन मिळायला मदत होते. त्यामुळे पात्र शेतकऱ्यांनी योजनेची माहिती घेऊन जवळच्या CSC केंद्रात नोंदणीबद्दल चौकशी करा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

रात्री वारंवार लघवीला जावं लागतंय, काही गंभीर आजाराचे संकेत तर नाहीत ना? जाणून घ्या

हजारो किलोमीटरचा प्रवास करून आला हिवाळी पाहुणा! बोर धरणावर दुर्मिळ ‘युरेशियन स्पॅरोहॉक’चे आगमन

Maharashtra News Live Update: नंदुरबारमध्ये पोलिसांची मोठी कारवाई! कापसाच्या शेतात गांजाची शेती; 15 लाखांचा मुद्देमाल जप्त

Skin Care : तरूण तुर्क...चेहऱ्यावरच्या सुरकुत्यांना करा 'बाय-बाय'! नितळ आणि टवटवीत त्वचेसाठी ५ रामबाण उपाय

या फोटोमध्ये एकूण किती पक्षी लपलेले आहेत?

SCROLL FOR NEXT