PF claim meta ai
बिझनेस

कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! 20 दिवसांत PF पैसे नाही आले तर काय करायचं? EPFO चा नवा नियम

EPFO New Rules 2026 : EPFO च्या नव्या नियमांनुसार PF क्लेम 20 दिवसांत निकाली काढणे आवश्यक आहे. विलंब झाल्यास EPFiGMS वर तक्रार करता येते. CITES 2.01 मुळे PF रक्कम काढण्याची माहिती आधी पाहता येईल.

Sakshi Sunil Jadhav

तुम्ही तुमच्या कंपनीत पीफमध्ये दरमहा रक्कम जमा करत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. खासगी क्षेत्रातल्या कर्मचाऱ्यांसाठी भविष्य निर्वाह निधी म्हणजेच पीएफ हा महत्त्वाचा आर्थिक आधार आहे. रिटायरमेंटनंतर किंवा गरजेच्या वेळी पीएफ मधली रक्कम उपयोगी पडते. मात्र, अनेकदा पीएफ क्लेम केल्यानंतर पैसे खात्यात जमा व्हायला उशीर होतो. अशा वेळी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

२० दिवसांत PF क्लेम निकाली काढणे महत्त्वाचे

कामगार आणि रोजगार मंत्रालयाने जून २०२६ मध्ये कर्मचारी भविष्य निर्वाह निधी योजना २०२६, कर्मचारी पेन्शन योजना २०२६ आणि कर्मचारी ठेव-लिंक्ड विमा योजना २०२६ अधिसूचित केली. हा नियम २९ जून २०२६ पासून लागू झाला. नव्या नियमानुसार, PF, पेन्शन आणि कर्मचारी ठेव-लिंक्ड विमा योजनेशी संबंधित दावा २० दिवसांच्या आत निकाली काढणे आवश्यक आहे.

उशीर झाल्यास तक्रार कुठे करायची?

२० दिवस उलटूनही PF क्लेमचा निपटारा झाला नाही, तर कर्मचारी EPFO कडे तक्रार करू शकतो. यासाठी प्रादेशिक संचालकांशी संपर्क साधता येतो. तसेच EPFiGMS पोर्टलवर ऑनलाइन तक्रार दाखल करण्याची सुविधा आहे.

दर महिन्याच्या १० तारखेला तक्रार निवारण कार्यक्रम आयोजित केला जातो. या कार्यक्रमात PF आणि पेन्शनशी संबंधित अडचणी मांडता येतात.

उशीर झाल्यावर व्याज मिळू शकते?

मुंबईतील ग्राहक आयोगाच्या एका प्रकरणात PF क्लेमच्या विलंबाबाबत EPFO ला ६ टक्के वार्षिक व्याज देण्याचे निर्देश देण्यात आले. संबंधित कर्मचाऱ्याचा क्लेम सुमारे १४.०६ लाखांचा होता आणि त्याच्या सेटलमेंटमध्ये ३५ दिवसांचा उशीर झाला होता. मात्र, अशा प्रकरणात अतिरिक्त व्याज किंवा नुकसानभरपाई मिळणे हे संबंधित प्रकरणातील आदेश आणि परिस्थितीवर अवलंबून असते.

PF मधून किती रक्कम काढता येईल हे आधीच कळणार

EPFO ने CITES २.०१ सॉफ्टवेअर अपग्रेड केले आहे. या नव्या प्रणालीमुळे उपचार, घर खरेदी, लग्न आणि शिक्षण अशा कारणांसाठी नियमांनुसार जास्तीत जास्त किती PF रक्कम काढता येईल, हे सदस्यांना आधीच पाहता येणार आहे.

तसेच, नव्या बदलानुसार काही PF आगाऊ रक्कम काढण्यासाठी किमान १२ महिन्यांची सेवा गरजेची असल्याचं नमूद करण्यात आलं आहे. यामुळे गरजेच्या वेळी किती रक्कम काढता येईल, हे कर्मचाऱ्यांना आधीच समजणे सोपे होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Congress Protest Live Update : काँग्रेसच्या आंदोलनावर किरेन रिजिजू यांची टीका; म्हणाले, ‘काँग्रेस दिशाहीन’

Red Saree Designs For Women: महिलांसाठी लाल साड्यांच्या सुंदर डिझाईन्स, 5 पॅटर्न्स पाहून प्रेमात पडाल

Maharashtra News Live Update: MPSC पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई! आणखी एका आरोपीला अटक; आतापर्यंत १२ जणांना अटक

Hotel Safety Tips: हॉटेलमध्ये चेक-इन केल्यावर काय काय तपासून घ्यावे? 5 महत्वाच्या गोष्टी

Devendra Fadnavis: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राहुल गांधी यांच्यावर गंभीर आरोप; काँग्रेसच्या आंदोलनावरही घेतली शंका

SCROLL FOR NEXT