PM Kisan Yojana : शेतकऱ्यांना दरमहा ₹3,000 पेन्शन! 60 वर्षांनंतर मिळणार लाभ, जाणून घ्या अर्जाची प्रोसेस

Government Scheme : प्रधानमंत्री किसान मानधन योजनेत पात्र शेतकऱ्यांना वयाच्या 60 वर्षानंतर दरमहा ३००० रुपये पेन्शन मिळू शकते. पात्रता, योगदान, कागदपत्रे आणि अर्ज प्रोसेस जाणून घ्या.
PM Kisan Mandhan Yojana
PM Kisan Mandhan Yojanameta ai
Published On

सरकार शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी यासाठी विविध योजना राबवत असतं. यापैकी प्रधानमंत्री किसान मानधन योजना (PM-KMY) ही शेतकऱ्यांना म्हातारपणात आर्थिक आधार देणारी महत्त्वाची पेन्शन योजना आहे. या योजनेला सात वर्ष पूर्ण झाली असून, देशभरात २५ लाख शेतकरी या योजनेशी जोडले गेले आहेत.

या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वयाच्या ६० वर्षानंतर किमान ३,००० रुपये मासिक पेन्शन मिळते. विशेष म्हणजे, शेतकरी जेवढे योगदान देतो, तेवढेच योगदान केंद्र सरकारकडूनही पेन्शन फंडात दिले जाते.

किती प्रीमियम भरावा लागतो?

पीएम किसान मानधन योजनेत १८ ते ४० वर्षे वयोगटातल्या शेतकरी सहभागी होऊ शकतात. वयाच्या ६० वर्षापर्यंत शेतकऱ्याला नियमित योगदान भरावं लागतं. कमी वयात सहभागी झाल्याने योगदानाची रक्कम कमी असते. १८ वर्षांच्या शेतकऱ्याला दरमहा ५५ रुपये, २० वर्षांच्या शेतकऱ्याला ६१ रुपये, २५ वर्षांना ८० रुपये, ३० वर्षांच्या व्यक्तींना १०५ तर ४० वर्षांच्या शेतकऱ्याला २०० रुपये मासिक योगदान द्यावं लागतं.

PM Kisan Mandhan Yojana
LPG Subsidy Rule: 1 ऑक्टोबरपासून 'या' ग्राहकांना मिळणार नाही सब्सिडी; आधारचं हे काम केलं नसेल तर सब्सिडी मिळणार नाही


कोणाला मिळतो योजनेचा लाभ?

या योजनेचा लाभ २ हेक्टरपर्यंत शेतीयोग्य जमीन असलेल्या लहान आणि सीमांत शेतकऱ्यांना मिळू शकतो. शेतकऱ्याचे नाव संबंधित राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशाच्या जमीन नोंदीत असणे आवश्यक आहे. आधार कार्ड, बँक खातं आणि मोबाइल क्रमांकाची आवश्यकता असते. मात्र, NPS, EPFO किंवा ESIC अंतर्गत येणारे तसेच आयकर भरणारे शेतकरी या योजनेसाठी पात्र नाहीत.

PM Kisan Mandhan Yojana
DA Hike : कर्मचाऱ्यांची दिवाळीत चांदी! पगार वाढणार, 'या' राज्यात DA मध्ये थेट 8% वाढ

अर्ज कसा करायचा?

योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकरी जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटर (CSC) येथे जाऊ शकतात. आधार कार्ड, बँक पासबुक किंवा कॅन्सल चेक आणि जमिनीची कागदपत्रे सोबत न्यावी लागतात. CSC ऑपरेटर ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया पूर्ण करतो. नोंदणी झाल्यानंतर शेतकऱ्याला पेन्शन अकाउंट नंबर आणि किसान कार्ड दिलं जातं. शेतकऱ्याच्या मृत्यूनंतर त्याच्या जीवनसाथीला नियमानुसार ५० टक्के म्हणजेच १,५०० रुपये मासिक कौटुंबिक पेन्शन मिळू शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com