EPFO Saam Tv
बिझनेस

PF वरील व्याजदर वाढणार! EPFO च्या बैठकीत मोठा निर्णय होण्याची शक्यता

EPFO Will Increase PF Interest Rate: कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या बैठकीत पीएफबाबत मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे. पीएफवरील व्याजदरात वाढ होऊ शकते.

Siddhi Hande

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी म्हणजे ईपीएफओ केंद्रिय कर्मचाऱ्यांसाठी पॉलिसीमध्ये मोठा बदल करण्याच्या तयारी आहे. ईपीएफओकडून पीएफबाबत मोठा निर्णय घेतला जाऊ शकतो. याबाबत मोठी घोषणा २८ फेब्रुवारी रोजी होऊ शकते. २८ फेब्रुवारी रोजी ईपीएफएओची बैठक होणार आहे. यामध्ये मोठा निर्णय होऊ शकतो.(EPFO News)

ईपीएफओची सीबीटी बैठक २८ फेब्रुवारी रोजी होणार आहे. यामध्ये पीएफ वरील व्याजदर वाढू शकते. यामध्ये व्याजदर ८.२५ टक्क्यांवरुन जास्त वाढवले जाऊ शकते. सध्या आर्थिक वर्ष २०२४ मध्ये पीएफवरील व्याजदर हे ८.२५ टक्के आहे. हे वाढवले जाण्याची शक्यता आहे.

ईपीएफओ नेहमी पीएफवरील व्याजदरात बदल करत असते. २०२४ मध्ये व्याजदर ८.२५ टक्के केले होते. २०२३ मध्ये पीएफवरील व्याजदर ८.१५ टक्के होते.२०२२ मध्ये व्याजदर ८.१० टक्के होते. २०१०-११ मध्ये सर्वाधिक व्याजदर दिले जाते. ९.५० टक्के व्याजदर दिले जाते. हे व्याजदर दरवर्षी बदलले जाते.ईपीएफओ पीएफवरील व्याजदरात वाढ करण्याची शक्यता आहे. याबाबत २८ फेब्रुवारी रोजी मोठा निर्णय होऊ शकतो.

प्रत्येक कर्मचाऱ्याचे पीएफ अकाउंट हे असते. पीएफ अकाउंटमध्ये दर महिन्याला कर्मचाऱ्याच्या पगारातील काही टक्के रक्कम पीएफमध्ये गुंतवली जाते. पीएफवरील व्याजदर हे सारखे बदलत असते. कर्मचाऱ्यांच्या अकाउंटमध्ये व्याजदर जमा केले जाते. ही एक सुरक्षित योजना आहे. यामध्ये गुंतवलेली रक्कम तुम्हाला सेवानिवृत्तीनंतर मिळते. तसेच त्यातील काही रक्कम तुम्हाला पेन्शन स्वरुपात मिळते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pannalal Surana : ज्येष्ठ समाजवादी विचारवंत पन्नालाल सुराणा यांचे निधन, वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Shani Dev: पुढच्या वर्षी शनीच्या चालीत होणार ५ वेळा बदल; शनी देव या राशींना करणार श्रीमंत

Maharashtra Live News Update: आंगणेवाडी यात्रा 9 फेब्रुवारीला होणार

Ladki Bahin Yojana: ₹३००० की ₹१५००; लाडक्या बहि‍णींना डिसेंबरमध्ये किती पैसे मिळणार? वाचा सविस्तर

भारताशेजारच्या ३ देशात अस्मानी संकट, १३०० हून अधिक लोकांचा मृत्यू, ८०० जण बेपत्ता

SCROLL FOR NEXT