
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या संबंधित मोठी बातमी समोर येत आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधीत युनिव्हर्सल अॅक्टिव्हेशन नंबर सक्रिय करण्याची अंतिम मुदत वाढण्यात आलीय. एम्प्लॉयमेंट लिंक्ड इन्सेन्टिव्ह आणि बँक खाते आधारशी लिंक करण्याची शेवटची तारीख १५ मार्च २०२५ पर्यंत वाढवण्यात आली आहे. ही मुदत अनेकदा वाढवण्यात आली होती. आता पुन्हा एकदा मुदतवाढ करण्यात आली आहे.
मुदत वाढ
कामगार आणि रोजगार मंत्रालयाने २१ फेब्रुवारीला जारी केलेल्या परिपत्रकात म्हटलंय की, यासंदर्भात अधिकाऱ्यांनी यूएएन सक्रियकरण आणि आधार बँक खात्याशी लिंक करण्याची मुदत १५ मार्च २०२५ पर्यंत वाढवण्यात आली आहे.
यूएएन म्हणजेच युनिव्हर्सल अकाऊंट नंबर. हा इपिएफओद्वारे प्रत्येक नोकरदार कर्मचाऱ्याला जारी केला जातो. हा १२ अंकी क्रमांक आहे. याचे फायदे अनेक आहेत. यूएएन क्रमांकामुळे कर्मचारी त्यांच्या इपीएफ खात्याशी संबंधिक ऑनलाइन सेवांचा लाभ घेऊ शकतात.
हा नंबर कर्मचारी भविष्य निधी संघटन यांच्याकडून प्रत्येक नोकरदार व्यक्तीला देण्यात येतो. यूएएन क्रमांक कर्मचाऱ्यांना दरवेळी नवीन कंपनीमध्ये रूजू झाल्यानंतर द्यावा लागतो. यामुळे पीएफची रक्कम थेट खात्यात जमा होईल.
इएलए योजनेअंतर्गत आर्थिक लाभ मिळवण्यासाठी कर्माचाऱ्यांना यूएएन नंबर सक्रिय करणे आणि बँक खाते आधारशी लिंक करणे अनिवार्य आहे. सोशल मीडियावर इपिएफओने पोस्ट शेअर केली आहे, त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं की, 'एम्प्लॉयमेंट लिंक्ड इन्सेन्टिव्ह योजनेचे लाभ मिळवण्यासाठी आधार तुमच्या बँक खात्याशी जोडणे अनिवार्य आहे'.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.