EPFO  Saam Tv
बिझनेस

PF interest Rate: खुशखबर! PF खात्यावरील व्याजदर वाढण्याची शक्यता; सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

PF interest Rate May Increase: अर्थसंकल्पात सर्वसामान्य नागरिकांसाठी मोठी घोषणा केली आहे. त्यानंतर पीएफ खातेधारकांसाठी मोठा निर्णय घेतला जाऊ शकतो. पीएफवरील व्याजदरात वाढ केली जाऊ शकते.

Siddhi Hande

अर्थसंकल्पामध्ये सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी १२ लाखांच्या उत्पन्नावर कोणताही टॅक्स न लागणार असल्याची घोषणा केली आहे. त्यानंतर सर्वसामान्य नागरिकांसाठी अजून एक घोषमा होण्याची शक्यता आहे. टॅक्समध्ये सूट मिळाल्यानंतर पीएफबाबत मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे.

ईपीएफओच्या केंद्रिय बोर्ड ट्रस्टीची २८ फेब्रुवारी रोजी बैठक होणार आहे. या बैठकीत पीएफवरील व्याज वाढवण्याची शक्यता आहे. या बैठकीचे कारण अद्याप समोर आलेले नाही. परंतु या बैठकीत ईपीएफओ कर्मचाऱ्यांसाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले जाऊ शकतात.

पीएफवरील इंटरेस्ट रेट वाढण्याची शक्यता (PF Interest Rate May Increase)

भारत सरकारचे मुख्य लक्ष हे मार्केटमधील डिमांडला वाढवणे आहे. त्यामुळे १२ लाखांच्या उत्पन्नावर टॅक्स फ्री करण्यात आला आहे. यामुळेच सर्वसामान्यांना फायदा होणार आहे. सर्वसामान्यांना अजून फायदा मिळवून देण्यासाठी पीएफबाबत मोठा निर्णय होऊ शकतो.

संगठीत क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याचे पीएफ अकाउंट असते. पीएफ अकाउंटमध्ये दर महिन्याला एक ठरावीक रक्कम जमा केली जाते. यातील काही पैसे हे पेन्शसाठी जमा केले जातात.

पीएफमधील गुंतवणूकीवर सर्वाधिक व्याज दिले जाते. २०२२-२३ मध्ये पीएफचा इंटरेस्ट ८.१५ टक्के होता. २०२३-२४ मध्ये तो वाढवून ८.२५ करण्यात आला. आता हे व्याजदर अजून वाढण्याची शक्यता आहे. (PF Interest Rate)

देशात जवळपास सात कोटींपेक्षा जास्त लोकांचे पीएफ खाते आहे. २०२३-२४ च्या रिपोर्टनुसार, ७ कोटी ३७ लाख लोकांचे पीएफ खाते आहे. याचसोबत पेन्शन फंडमध्ये पैसा जमा करणाऱ्यांची संख्या ८ लाख झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Elections:भाजपला रोखण्यासाठी काका-पुतण्या एकत्र? ठाकरेंपाठोपाठ दोन्ही राष्ट्रवादीचीही युती?

KDMC Election: भाजपा–शिवसेना शिंदे गटकाडून युतीचे संकेत; मात्र जागा वाटपाचा तिढा अजूनही गुलदस्त्यात

Kalyan Politics: फोडाफोडीवरून महायुतीत पुन्हा वाद; शिवसेनेनं नगरसेवक पळवल्यानंतर भाजप आक्रमक

Maharashtra Elections: बायको, मुलगा-मुलगी,भाऊ-बहिणींनाच हवीय उमेदवारी; नेत्यांना फक्त आपल्याच घरात हवं तिकीट

कराडची जामीनासाठी न्यायालयात धाव, सुटकेनंतर समर्थक काढणार हत्तीवरून मिरवणूक?

SCROLL FOR NEXT