PF Balance  saam tv
बिझनेस

PF Balance: तुमचे पीएफचे पैसे जमा झाले की नाही? ३ पद्धतीने तपासा, एका झटक्यात समजेल तुमचा बॅलेन्स

EPFO Update: तुमचा पीएफ वेळेवर जमा होतोय का? UNA नंबरच्या मदतीने तुम्ही अनेक अॅप्स मध्ये तुमच्या पगाराची संपूर्ण माहिती मिळवू शकता.

Sakshi Sunil Jadhav

अनेक कर्मचारी त्यांच्या पगारातली काही रक्कम ही भविष्यासाठी जमा करत असतात. कंपनी ही त्यांच्या पगारातला काही टक्के भाग हा PF म्हणून जमा करत असते. हे पैसे तुम्हाला भविष्यात एखाद्या महत्वाच्या कामासाठी येऊ शकतात. तसेच भविष्यात रिटायरमेंटनंतर तुम्ही हे पैसे पेन्शन म्हणून वापरु शकता. पण बऱ्याच जणांचे त्यांच्या खात्यात उशीरा जमा होतात. त्यामुळे त्याची तपासणी करुन पैसे जमा न झाल्यामुळे तुम्ही कंपनीला जाब सुद्धा विचारु शकता.

पीफचे पैसे कुठे तपासायचे?

EPFO(Employees'Provident Fund Organisation) ने तुम्हाला UNA नंबर दिला असेल. याच्याच मदतीने तुम्ही तुम्ही तुमच्या पीफमध्ये दर महिन्याचे पैसे जमा होतायेत का? हे तपासू शकता.

PF का तपासावा?

सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमचा पीफ कंपनी तुमच्या पगातून नकळत जमा करते. त्यामुळे तुम्हाला हे वेळेवर जमा होतायेत की नाही हे तपासणं गरजेचं आहे. त्यातच नवे आर्थिक वर्षे २०२६-२०२७ सुरु झालं आहे. त्यामुळे आता पगारवाढ होईल. तसेच मे महिन्याचा पगार नव्या आकड्यांमध्ये येईल. पण मागचा महिन्याचे म्हणजे एप्रिलचे पैसे खात्यात जमा झाले की, नाही हे तपासणं योग्य ठरेल. पुढील माहितीत आपण PF चे पैसे कुठे तपासू शकतो? हे जाणून घेणार आहोत.

PF चे पैसे कसे तपासायचे? (How to check PF money?)

१. उमंग (UMANG APP)

तुम्ही सरकारचं उमंग अॅप डाउनलोड करुन तपासू शकता. त्यात EPFO शोधून View Passbook या पर्यायावर क्लिक करा. मग तुमचा UNA नंबर टाकून ओटीपी मिळवा. तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल.

२. EPFO पोर्टल

EPFO ची अधिकृत वेबसाईट सुरु करा. म्हणजेच epfindia.gov.in साईट ओपन करा. मग Our Services वर क्लिक करा. त्यानंतर फॉर एम्लोयीसवर क्लिक करा. मग मेंबर पासबूक या पर्यायावर क्लिक करुन लॉगिन करा.

३. मिस्ड कॉल

सगळ्यात सोपी पद्धत म्हणजे तुम्ही एका मिस्ड कॉलमध्ये तुमच्या पीफबद्दल जाणून घेऊ शकता. त्यासाठी 011-22901406 या नंबरवर कॉल करा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पुलासाठी ७ कोटी खर्च केला, ३ वर्षांत तडे गेले; प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण

नवी मुंबईत 'हिट अँड रन', बेलापूरजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत ३८ वर्षीय स्कूटर चालकाचा मृत्यू

Naneghat Tourism: निसर्गप्रेमींना भुरळ घालणारे नाणेघाट; पावसाआधीच धुक्याने वेढला घाट, ट्रिपसाठी लगेच करा प्लॅन

RCB playoff news: प्लेऑफपूर्वी RCB ला मोठा झटका; हा मॅनविनर खेळाडू पडला बाहेर

Maharashtra News Live Update: महागाईच्या विरोधात शिवसेना शिंदे गटाचे नंदुरबारमध्ये आंदोलन

SCROLL FOR NEXT