Petrol Diesel Saam Tv
बिझनेस

Petrol Price News: खुशखबर! फेब्रुवारीत पेट्रोल 10 रुपयांनी स्वस्त होण्याची शक्यता

Petrol Price In February: नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. निवडणुकीपूर्वी फेब्रुवारीत पेट्रोल 10 रुपयांनी स्वस्त होणार असल्याची माहिती मिळतेय.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Petrol Will Be Cheaper By rs 10

सर्वसामान्य जनतेला दिलासा देण्यासाठी आणि निवडणुकीपूर्वी महागाईवर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकार सातत्यानं प्रयत्न करत आहे. याचाच एक भाग म्हणजे, देशातील सरकारी तेल कंपन्या फेब्रुवारी महिन्यात पेट्रोल (Petrol) आणि डिझेल स्वस्त करतील, अशी शक्यता व्यक्त केली जात आहेत. दोन्हीच्या किमती 10 रुपयांनी कमी करण्याचा विचार केला जातोय. (latest marathi news)

तेल कंपन्यांचा नफा तिसऱ्या तिमाहीत 75 हजार कोटी रुपयांवर पोहोचण्याची शक्यता आहे. जर पेट्रोल स्वस्त झालं तर, यामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळेल. 2024 च्या निवडणुकीपूर्वी महागाई नियंत्रणात ठेवण्यास मोठी मदत होईल.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

ग्राहकांना चांगला फायदा होणार

सरकारी OMC ने एप्रिल 2022 पासून पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये (Petrol Price) कोणताही बदल केलेला नाही. तर मे महिन्यात केंद्र सरकारने करात कपात केली होती. त्यानंतर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात घट झाली होती. 2022-23 च्या संपूर्ण आर्थिक वर्षाशी तुलना केल्यास चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत नफ्यात 4,917 टक्के वाढ झाली आहे. आर्थिक वर्ष 2023-24 च्या पहिल्या सहामाहीत भरीव निव्वळ नफा कमावला आहे. यावेळी पेट्रोल आणि डिझेल प्रतिलिटर 10 रूपयांनी स्वस्त होवू शकते. त्यामुळं ग्राहकांना चांगला फायदा होणार आहे.

पेट्रोल डिझेल 10 रुपयांनी स्वस्त होणार

एचटी अहवालात इंधन विक्रीवरील उच्च विपणन मार्जिनमुळे, तीन ओएमसींनी चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या आणि दुसऱ्या तिमाहीत मोठा नफा कमावला आहे. जो तिसऱ्या तिमाहीत सुरू राहू शकतो, असं म्हटलं आहे. आता या महिन्याच्या अखेरीस या तिन्ही कंपन्यांचे तिमाही निकाल जाहीर होतील. त्यानंतर कच्च्या तेलाच्या आंतरराष्ट्रीय किमती लक्षात घेऊन कंपन्या पेट्रोल आणि डिझेलच्या (Petrol Diesel) किमती 5 ते 10 रुपयांनी कमी करू शकतात. कंपन्यांच्या लाभार्थ्यांशी चर्चा करून हा निर्णय घेतला जाईल, असे सूत्रांनी सांगितलं आहे.

दुसऱ्या तिमाहीतील नफा

कच्च्या तेलाच्या कमी किमती आणि उच्च सकल शुद्धीकरण मार्जिन (GRM) यामुळे हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (HPCL) ने गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये जुलै-सप्टेंबर या तिमाहीत रु. 5,826.96 कोटी नफा कमावला होता. भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन (BPCL) ने सप्टेंबर तिमाहीत 8,244 कोटी रुपयांचा नफा कमावला आहे. दुसरीकडे, IOCL चा निव्वळ नफा 12,967 कोटी रुपये होता. याचा अर्थ तिन्ही कंपन्यांचा निव्वळ नफा 27,038 कोटी रुपये होता.

पहिल्या तिमाहीत नफा

IOCL ला पहिल्या तिमाहीत 13,750 कोटी रुपयांचा नफा झाला होता. तर दुसऱ्या जून तिमाहीत बीपीसीएलला 10,550.88 कोटी रुपयांचा नफा झाला होता. तर HPCL ने जून तिमाहीत 6,203.90 कोटी रुपयांचा नफा नोंदवला होता. तज्ञांच्या मते, या तिमाहीत तिन्ही कंपन्यांचा एकत्रित नफा 30,504.78 कोटी रुपये होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: निलंगा उपजिल्हाअधिकारी कार्यालयासमोर महादेव कोळी आदिवासी समाज बांधवांचा ठिय्या

Shocking: पोहण्यासाठी धरणात उडी मारली, परत बाहेर आलेच नाहीत; ४ जिवलग मित्रांचा मृत्यू

Shahapur : माता न तू वैरिणी! पोटच्या तीनही मुलींना आईनेच दिले जेवणातून विष; मुलींचा मृत्यू

Mhada: मुंबईतील म्हाडाच्या अधिकाऱ्याच्या पत्नीची आत्महत्या; आलिशान फ्लॅटमध्ये आयुष्याचा दोर कापला

Bihar News: उपमुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी; '२४ तासात स्रमाट चौधरी यांना गोळी घालेन'

SCROLL FOR NEXT