Petrol-Diesel Rate Today on June 13: इराण-इस्त्राइल युद्धामुळे सुरू असलेला संघर्ष आणि होर्मुझच्या सामुद्रधुनीजवळील वाढत्या तणावामुळे जगभरात पेट्रोल-डिझेलचा पुरवठा विस्कळीत झालाय. त्यामुळे इंधनाच्या दरात चढ-उतार होतोय. केंद्र सरकारच्या नव्या आदेशानुसार, आता औद्योगिक, व्यावसायिक आणि संस्थात्मक वापरकर्त्यांना पेट्रोल पंपांवरून पेट्रोल आणि डिझेल खरेदी करण्यास बंदी घालण्यात आली आहे. त्यांना घाऊक विक्री केंद्रांवरून इंधन खरेदी करण्यास सांगितले आहे.
पीटीआयच्या रिपोर्ट्सनुसार, पुढील ९० दिवसांसाठी हे निर्बंध लागू राहतील. दरातील फरकामुळे घाऊक ग्राहकांनी पेट्रोल पंपांवरून इंधन खरेदी करण्यास सुरुवात केल्यानंतर काही भागांमध्ये इंधनाच्या मागणीत अतिप्रमाणात वाढ झाली. त्यानंतर केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे. आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल नोंदवण्यात आला नाही. इंधनाचे दर स्थिर आहेत. मागील महिन्यात ४ वेळा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली होती. आज पुणे आणि मुंबईमध्ये पेट्रोल प्रति लीटर १११.१८ रूपये तर डिझेल ९७.८३ रुपये इतक्या दरावर विक्री होत आहे. देशातील इतर शहरातही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.
इंधनाच्या किंमती का वाढत आहेत?
जागतिक स्तरावर कच्च्या तेलाच्या किंमतीमध्ये सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे सरकारी मालकीच्या किरकोळ विक्रेत्यांना प्रचंड तोटा सहन करावा लागत आहे. त्यामुळे तोटा काही प्रमाणात भरून काढण्यासाठी वाढीव दर ग्राहकांवर लादण्यास सुरुवात केली. २५ मे रोजी तेल विपणन कंपन्यांनी (OMCs) पेट्रोल आणि डिझेल या दोन्हीच्या दरात प्रति लिटर ₹२.५० पेक्षा जास्त वाढ केली. त्यामुळे १५ मे पासून झालेली एकूण वाढ प्रति लिटर ₹७.५० झाली आहे. भारतातील पेट्रोल आणि डिझेलच्या किमती गेल्या चार वर्षांतील सर्वोच्च पातळीवर आहेत.
पीटीआयच्या वृत्तानुसार, राज ठाकरे यांच्या ५८ व्या जयंतीनिमित्त मनसे १४ जून रोजी दुचाकीस्वारांना सवलतीच्या दरात पेट्रोल देणार आहे. सकाळी ९ वाजल्यापासून सवलतीच्या दरात पेट्रोल उपलब्ध करून देण्यासाठी शहरातील ३६ पेट्रोल पंपांसोबत करार केले आहेत. मात्र ही सेवा केवळ मुंबईतच उपलब्ध असेल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.