Petrol Diesel Rate Saam Tv
बिझनेस

Petrol Diesel Rate:आठवड्याच्या पहिल्याच दिवशी पेट्रोल डिझेलच्या किंमती किती? वाचा एका क्लिकवर

Siddhi Hande

देशभरात रोज पेट्रोल डिझेलचे नवे दर जाहीर होत असताच. आज ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात पेट्रोल डिझेलच्या भावात कोणताही बदल झालेला नाही. जवळपास मागील सहा महिन्यांपासून पेट्रोल डिझेलचे भाव स्थिर आहेत. त्यामुळे वाहनाधारकांच्या खिशाला फटका बसत आहे.

पेट्रोल डिझेलचे भाव हे कच्च्या तेलाच्या किंमतीवर अवलंबून असतात. कच्च्या तेलाच्या किंमती या आंतरराष्ट्रीय बाजारात रोज सकाळी ठरवल्या जातात. आज WTI क्रूड ऑइल ७६.५२ डॉलरवर विकले जात आहे तर ब्रेंट क्रूड ऑइल ७९.७० डॉलरवर विकले जात आहे. चला तर मग जाणून घेऊया तुमच्या शहरातील पेट्रोल डिझेलचे भाव.

देशातील प्रमुख शहरातील इंधनाचे दर

नवी दिल्लीत पेट्रोल ९४.७२ डॉलरवर विकले जात आहे तर डिझेल ८७.६२ डॉलरवर विकले जात आहे. मुंबईत पेट्रोलची किंमत १०३.४४ रुपये आहे तर डिझेलची किंमत ८९.९७ रुपये आहे. कोलकत्त्यात पेट्रोलची किंमत १०४.९५ रुपये आहे तर डिझेलची किंमत ९१.७६ रुपये आहे. चेन्नईत पेट्रोलची किंमत १००.७५ रुपये आहे तर डिझेलची किंमत ९२.३४ रुपये आहे.

महाराष्ट्रातील पेट्रोल डिझेलचे दर

पुण्यात पेट्रोलची किंमत १०३.७६ रुपये आहे तर डिझेलची किंमत ९०.३० रुपये आहे.ठाण्यात पेट्रोल १०३.५१ रुपये प्रति लिटरवर विकले जात आहे तर डिझेल ९०.०३ रुपये प्रति लिटरवर विकले जात आहे. नाशिकमध्ये पेट्रोलची किंमत १०४.४३ रुपये आहे तर डिझेलची किंमत ९०.९५ रुपये आहे.नागपूरमध्ये पेट्रोल १०३.९४ रुपये प्रति लिटरवर विकले जात आहे तर डिझेल ९०.५१ रुपयांवर विकले जात आहे.अहमदनगरमध्ये पेट्रोलची किंमत १०४.७६ रुपये आहे तर डिझेलची किंमत ९१.२६ रुपये आहे. छत्रपती संभाजी नगरमध्ये पेट्रोलची किंमत १०४.३४ रुपये आहे तर डिझेलची किंमत ९०.८६ रुपये आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT