Petrol Diesel Rate  Saam Tv
बिझनेस

Petrol Diesel Rate Today: महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेलचे नवीन दर जाहीर; मुंबई, पुण्यात आजचा भाव काय? जाणून घ्या

Petrol Diesel Rate 1st July: पेट्रोल डिझेलच्या किंमतीत सातत्याने बदल होताना दिसत आहे. आज पेट्रोल डिझेलचे भाव कमी झाले आहेत. जाणून घ्या तुमच्या शहरातील पेट्रोल डिझेलचे भाव.

Siddhi Hande

गेल्या काही दिवसांत पेट्रोल डिझेलच्या किंमतीत सातत्याने चढ-उतार होताना दिसत होते. महाराष्ट्रात विधानसभेत झालेल्या अर्थसंकल्पात पेट्रोल डिझेलवरील वॅट कर कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळेच पेट्रोल डिझेलचे दर कमी झाले आहेत. पेट्रोल डिझेलचे दर कमी झाल्याने सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

मुंबई, नवी मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी पेट्रोल डिझेलचे भाव घसरले आहे. जवळपास ६५ रुपयांनी पेट्रोल स्वस्त झाले आहे. आज जुलै महिन्याच्या सुरुवातील पेट्रोल डिझेलचे भाव किती आहेत ते जाणून घेऊया.

महानगरांमधील पेट्रोल डिझेलचे भाव

दिल्लीत पेट्रोल ९४.७२ रुपयांनी विकले जात आहे. तर डिझेलची किंमत ८७.६२ रुपये आहे. मुंबईत पेट्रोलचा दर १०३.४४ रुपये आहे तर डिझेल ८९.९७ रुपयांवर विकले जात आहे. कोलकत्यात पेट्रोलचा दर १०३.९४ रुपये तर डिझेलचा दर ९०.७६ रुपये प्रति लिटर आहे. चेन्नईत पेट्रोलची किंमत १००.७५ रुपये प्रति लिटर आहे तर डिझेल ९२.३४ रुपये आहे.

राज्यातील प्रमुख शहरातील पेट्रोल डिझेलचे नवे दर

पुण्यात पेट्रोल १०४.५३ रुपये प्रति लिटर विकले जात आहे तर डिझेलची किंमत ९१.०४ रुपये आहे. ठाण्यात पेट्रोल १०३.५१ रुपये प्रति लिटर विकले जात आहे तर डिझेलची किंमत ९०.०३ रुपये प्रति लिटर आहे. कोल्हापूरमध्ये पेट्रोलची किंमत १०५.१६ रुपये आहे तर डिझेल प्रति लिटर ९१.८७ रुपयांना विकले जात आहे. नाशिकमध्ये पेट्रोलची किंमत १०४.४३ रुपयांना विकले जात आहे तर डिझेलची किंमत ९०.०५ रुपये प्रति लिटर आहे. नागपूरमध्ये पेट्रोल १०३.९६ रुपये आहे तर डिझेलची किंमत ९०.५२ रुपये आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: देवेंद्र फडणवीस राज्यातील गुन्हेगारांचे आका; काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची घणाघाती टीका

1280 रुपयांत सरकारी नोकरी? सरकारने नोकरीसाठी वेबसाईट बनवली?

Commonwealth Games: २० वर्षांनंतर भारताकडे कॉमनवेल्थ गेम्सचं यजमानपद; 'या' शहरात होणार राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचं आयोजन

मुंबईत 11 लाख दुबार मतदार, एकाच मतदाराचं 103 वेळा नाव

Thursday Horoscope : दिवसभरात कमीत कमी रिस्क घ्या; ५ राशींच्या नेत्यांनी काळजीपूर्वक निर्णय घ्यावेत, अन्यथा...

SCROLL FOR NEXT