Petrol Diesel Rate  Saam TV
बिझनेस

Petrol Diesel Rate Today: पेट्रोल डिझेलचे नवे दर जाहीर; एक लिटर पेट्रोलसाठी किती पैसे मोजावे लागणार? जाणून घ्या

Petrol Diesel Price 14th June 2024: पेट्रोल डिझेलच्या किंमती रोज जाहीर केल्या जातात. कच्च्या तेलाच्या किंमतीवर पेट्रोल डिझेलच्या किंमती अवलंबून असतात.

Siddhi Hande

पावसाळा सुरु झाला आहे. पावसाळ्यात अनेकजण फिरण्यासाठी बाहेर जातात. लोक फिरायला जाण्यासाठी खाजगी वाहनांचा वापर करतात. फॅमिली ट्रीप प्लान करताना नेहमी आपल्या सोयीनुसार वाहन वापरतात. वाहन चालवण्यासाठी पेट्रोल डिझेलची सर्वात जास्त गरज गरज असते. पेट्रोल डिझेलच्या किंमतीत गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चढ-उतार होताना दिसत आहेत. रोज सकाळी पेट्रोल-डिझेलच कंपन्या नवीन दर जाहीर करतात.

पेट्रोल डिझेलचे भाव कच्च्या तेलावर अवलंबून असतात. आंतरराष्ट्रीय बाजारात ब्रेंट क्रूड प्रति बॅरल ८२.०५ डॉलर लिकले जात आहे. तर WTI क्रूड ऑइल ७७.८६ डॉलर प्रति बॅरल विकले जात आहे. गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल डिझेलच्या भावात कोणताही बदल झालेला नाही. जाणून घ्या तुमच्या शहरातील पेट्रोल डिझेलचे भाव

महानगरांमधील पेट्रोल डिझेलचे भाव

मुंबईत पेट्रोल १०४.२१ रुपये प्रति लिटर विकले जात आहे तर डिझेल ९२.१५ रुपये प्रति लिटर विकले जात आहे. दिल्लीत पेट्रोलची किंमत ९४.७२ रुपये प्रति लितर आहे तर डिझेल ८७.६२ रुपयांना विकले जात आहे. कोलकत्तामध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर १०३.९४ रुपये तर डिझेलचा दर९०.७६ रुपये आहे. चेन्नईत पेट्रोलची किंमत १००.७५ रुपये तर डिझेलची किंमत ९२.३४ रुपये प्रति लिटर आहे.

महाराष्ट्रातील पेट्रोल डिझेलचे भाव

ठाण्यात पेट्रोलची किंमत १०३.९२ रुपये आहे. तर डिझेल ९०.४० रुपये प्रति लिटर विकले जात आहे. नाशिकमध्ये पेट्रोल १०४.६८ रुपये आणि डिझेल ९१.९० रुपयांना विकले जात आहे. पुण्यात पेट्रोलची किंमत १०३.९३ रुपये तर डिझेलची किंमत ९०.४६ रुपये आहे. कोल्हापूरमध्ये पेट्रोल १०४.४८ रुपये प्रति लिटर आणि डिझेल ९१.०२ रुपयांना विकले जाते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik Crime: साधूच्या वेशात सोन्याची लूट, भुरळ पाडून लाखोंचे दागिने लंपास; VIDEO व्हायरल

Radha Patil Dance: राधा पाटलावर गुन्हा, ऐश्वर्याला परवानगी नाकारली; कलाकारांचा बिभत्स डान्स आयोजकांनाही भोवणार

MPSC विद्यार्थ्यांचा आक्रोश! पुणे-कोल्हापुरात विद्यार्थी रस्त्यावर, अध्यक्ष अन् सचिवांच्या राजीनाम्याची मागणी

Maharashtra Politics: ठाकरेसेनेचे नगरसेवक बाद करण्याचा डाव? शिंदेसेनेचा मोठा डाव!

Manoj Jarange: मनोज जरांगेंना हल्ल्याची भीती, शिंदेसेनेचे 2 मंत्री आणि 2 प्रवक्यांवर खळबळजनक आरोप

SCROLL FOR NEXT