Petrol Diesel Prices (4 October) Saam TV
बिझनेस

Petrol Diesel Prices (4 October): मुंबईसह पुण्यातही पेट्रोलच्या किंमती घसरल्या; सर्वसामान्यांना मोठा दिलासा

Petrol Diesel Prices Down: गेल्या महिनाभरापासून चार महानगरांतील पेट्रोल-डिझेलच्या किंमती स्थिर आहेत.

Ruchika Jadhav

Aajche Petrol Diesel Bhaw:

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत सातत्याने बदल होत असतो. दररोज सकाळी ६ वाजता सरकारी तेल कंपन्या पेट्रोल-डिझेलच्या किंमती जाहीर करतात. आज WTI क्रूड ऑइल ०.१७ टक्क्यांनी वाढले असून ८९.३८ डॉलर प्रति बॅरलने विकलं जात आहे. ब्रेंट क्रूड ०.०९ टक्क्यांनी वाढलंय. त्यामुळे ९१ डॉलर प्रति बॅरलवर दर पोहचलेत. (Latest Marathi News)

कच्च्या तेलाच्या किंमतीत दररोज चढ उतार दिसत असले तरी चार प्रमुख महानगरांतील पेट्रोल (Petrol) डिझेलच्या किंमतीत बदल झालेला नाही. गेल्या महिनाभरापासून चार महानगरांतील पेट्रोल-डिझेलच्या किंमती स्थिर आहेत.

महानगरातील पेट्रोल डिझेलचे भाव

  1. मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये प्रति लिटर आहे. तर डिझेल 94.27 रुपये प्रति लिटरने विकलं जातंय.

  2. दिल्लीमध्ये पेट्रोल 96.72 रुपये प्रति लिटर आहे. तर डिझेल 89.62 रुपये प्रति लिटरने विकलं जातंय.

  3. कोलकत्तामध्ये पेट्रोल 106.03 रुपये प्रति लिटर आहे. तर डिझेल 92.76 प्रति लिटरने विकलं जातंय.

  4. चैन्नईमध्ये पेट्रोल 102.74 रुपये प्रति लिटर आहे. तर डिझेल 94.33रुपये प्रति लिटरने विकलं जातंय.

वेगवेगळ्या राज्यात पेट्रोल-डिझेलच्या किंमतींवर आकरल्या जाणाऱ्या टॅक्समुळे दरांमध्ये चढ-उतार पाहायला मिळतात. आज महाराष्ट्रात काही शहरांमध्ये पेट्रोल-डिझेलच्या किंमतींमध्ये बदल झाला आहे.

महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील पेट्रोल डिझेलच्या किंमती

  • पुण्यात पेट्रोल 105.84 रुपये आहे. तर डिझेल 92.68 रुपये प्रति लिटरवर पोहचलंय.

  • ठाण्यात पेट्रोल 105.97 रुपये आणि डिझेल 92.50 रुपये प्रति लिटर आहे.

  • छत्रपती संभाजी नगरमध्ये पेट्रोल 107.07 रुपये आणि डिझेल 95.96 रुपये प्रति लिटरने विकलं जातंय.

  • नाशिकमध्ये पेट्रोल 106.18 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 93.26 रुपये प्रति लिटर आहे.

  • नागपुरमध्ये पेट्रोल 106.27 रुपये आणि डिझेल 92.59 रुपये प्रति लिटर.

  • कोल्हापूरात पेट्रोल 106.25 रुपये आणि डिझेल 93.11 रुपये प्रति लिटर आहे.

  • महाराष्ट्रात पेट्रोलच्या किंमतीत १ रुपयाने घट झाल्याने सर्वसामान्यांना दिलासा मिळालाय.

तुमच्या शहरातील पेट्रोल डिझेलचे दर असे तपासा

तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती जाणून घेण्यासाठी HPCL ग्राहकांनी HPPRICE <डीलर कोड> 9222201122 वर पाठवावा. याशिवाय इंडियन ऑइलच्या ग्राहकांनी RSP <डीलर कोड> ९२२४९९२२४९ या क्रमांकावर मॅसेज पाठवा. BPCL च्या ग्राहकांसाठी पेट्रोल-डिझेलच्या किंमत जाणून घेण्यासाठी, <डीलर कोड> 9223112222 वर पाठवता येईल. हे कोट पाठवल्यावर काही मिनिटांतच तुम्हाला कच्च्या तेलाच्या किंमती किती आहेत हे समजेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Famous Actor Missing : 'मुन्ना भाई एमबीबीएस'मधील लोकप्रिय अभिनेता बेपत्ता; गर्लफ्रेंडसोबत होती भांडणं, नेमकं प्रकरण काय?

Maharashtra Live News Update : निलेश गायवळ यावर आत्तापर्यंत १० गुन्हे दाखल

Accident News : समृद्धी महामार्गावर एका रात्रीत चार अपघात; सुदैवाने जीवितहानी टळली

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना! ५ वर्षात मिळणार ५ लाखांचं व्याज; वाचा सविस्तर

Lifestyle: हार्ट अटॅक आणि स्ट्रोक येण्यामागे आपल्या 'या' घाणेरड्या सवयी कारणीभूत; धोका कोणाला जास्त?

SCROLL FOR NEXT