Shraddha Kapoor Traveled Auto Rikshaw: पुन्हा एकदा श्रद्धा कपूरच्या साधेपणाचं झालं दर्शन; अभिनेत्रीने महागडी कार सोडून चक्क रिक्षातून केला प्रवास
Shraddha Kapoor Traveled Auto Rikshaw
अनेकदा बॉलिवूड सेलिब्रिटी ट्रॅफिकमधून लवकरात लवकर सुटका मिळावी यासाठी रिक्षातून प्रवास करण्याचा विचार करतात. गेल्या काही दिवसांपूर्वी अभिनेत्री सारा अली खान, खासदार हेमा मालिनी, अभिनेता विक्की कौशल, वरुण धवन आणि अभिनेत्री श्रद्धा कपूर यांनी रिक्षातून प्रवास केलेला आहे. अशातच पुन्हा एकदा सोशल मीडियावर श्रद्धा कपूर चर्चेत आली आहे. श्रद्धा कपूरने आज मुंबईच्या रस्त्यावर रिक्षाने प्रवास केला आहे. सध्या हा प्रवास करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
श्रद्धाने मंगळवारी सकाळी रिक्षातून प्रवास केला. शुटिंगसाठी अभिनेत्री लक्झरी कारने नाही तर थेट रिक्षानेच गेली होती. श्रद्धाचा अनेकदा चाहत्यांना साधेपणा स्पष्ट दिसून आला होता. तिच्या साधेपणाची अनेकदा सोशल मीडियावर चर्चा सुद्धा झाली होती. श्रद्धाने लक्झरी कारने नाही तर रिक्षाने शुटिंग स्पॉट गाठल्याने तिच्या साधेपणाचे कौतुक केले जात आहे. यावेळी तिने फिकट हिरव्या रंगाचा टॉप आणि जीन्स परिधान केली होती. सोबतच अभिनेत्री बोल्ड मेकअपमुळे फारच सुंदर दिसत होती.
अभिनेत्री मंगळवारी सकाळी मुंबईतल्या वर्सोवा जेट्टीवर एका ब्रँडच्या शुटिंगसाठी पोहोचली होती. आज सकाळी अभिनेत्रीने शुटिंग स्पॉट गाठण्यासाठी रिक्षातून प्रवास केला होता. अभिनेत्रीला पाहण्यासाठी तोंडावर मास्क लावला होता. तिला पाहण्यासाठी तिच्या चाहत्यांनी भली मोठी गर्दी केली होती. यावेळी अभिनेत्रीने पापाराझींसह तिच्या चाहत्यांसोबतही मराठीतच संवाद साधला. श्रद्धाने काही पहिल्यांदाच मराठीमध्ये संवाद साधलेला नाही. तिने अनेकदा यापूर्वी मराठीमध्ये संवाद साधलेला आहे. दरम्यान, श्रद्धा शक्ती कपूर यांची मुलगी तर प्रसिद्ध अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरेची सख्खी भाची आहे.
दरम्यान, अभिनेत्रीच्या या व्हिडीओवर युजर्सने कमेंट केल्या आहेत. एका ब्रँडच्या शुटिंगसाठी श्रद्धाने रिक्षातून प्रवास केल्यामुळे तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. अभिनेत्रीच्या या व्हिडीओवर नेटकरी म्हणतो, सर्व स्टार किड्स एका बाजूला आणि श्रद्धा एका बाजुला... तर आणखी एकाने साधी श्रद्धा असं म्हणत तिचं कौतुक केलं आहे. तर आणखी एक युजर म्हणतो, खूप साधी आणि दयाळू श्रद्धा... अशा शब्दात तिच्या साधेपणाचं कौतुक नेटकऱ्यांनी केलं आहे.
श्रद्धा कपूर अखेरची रणबीर कपूरसोबत ‘तू झुठी मैं मक्कर’ या चित्रपटात दिसली होती. यासोबतच आता लवकरच श्रद्धा राजकुमार रावच्या ‘हॉरर स्त्री २’ मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा अमर कौशिक यांनी केली आहे. तर जिओ स्टुडिओ आणि दिनेश विजनने चित्रपटाची निर्मिती केली आहे. ‘हॉरर स्त्री २’मध्ये प्रमुख भूमिकेत राजकुमार राव, श्रद्धा कपूर, अपारशक्ती खुराना, अभिषेक बॅनर्जी आणि पंकज त्रिपाठी सारख्या बड्या सेलिब्रिटींची फौज चित्रपटामध्ये दिसणार आहे. हा चित्रपट २०२४ मध्ये प्रदर्शित होणार आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.