
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय आणि तितकाच वादग्रस्त रियालिटी शो 'बिग बॉस'चा १७ वा सीझन (Bigg Boss 17 ) लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. येत्या १५ ऑक्टोबरपासून या शोला सुरूवात होणार आहे. बिग बॉसचे चाहते या शोची आतुरतेने वाट पाहत आहेत. या शोबाबत सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे.
कोण-कोण सेलिब्रिटी या शोमध्ये सहभागी होणार हे जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. अशामध्ये बिग बॉस-१७ च्या सेटवरचा व्हिडीओ (Bigg Boss Season 17 Hosue) समोर आला आहे. हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.
'बिग बॉसच्या १७' व्या सीझनचं घर देखील खूपच आलिशान असणार आहे. बिग बॉसच्या घराचा जो व्हिडीओ समोर आला आहे त्यावरून हा अंदाज लावला जात आहे. या व्हिडीओच्या माध्यमातून बिग बॉसच्या घराची पहिली झलक दाखवण्यात आली आहे. यावर्षीची थीम खूपच जबरदस्त असणार असल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे.
बिग बॉस १७ ताजा खबर या इन्स्टा पेजवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, बिग बॉसच्या घरामध्ये फर्निचरचे काम सुरू असल्याचे दिसत आहे. यावर्षीचा सीझन हा खूपच खास असणार आहे कारण यावर्षीची थीम ही कपल विरूद्ध सिंगल अशी असणार आहे.
यंदा बिग बॉसच्या घरामध्ये अभिनेत्री अंकिता लोखंडे तिच्या पतीसोबत एन्ट्री घेणार असल्याची चर्चा सुरू आहे. तसंच, मुनावर फारूक, शीझान कान, अरमान मलिक, ईशा मालवीय आणि श्रीमान फैझू यांच्या नावाची देखील चर्चा सुरू आहे. ही नाव अद्याप कन्फर्म नाहीत. आता बिग बॉसच्या घरामध्ये नेमकं कोण सहभागी होणार ही अधिकृत यादी समोर आल्यावरच कळेल.
'बिग बॉस १७' च्या माध्यमातून अभिनेता सलमान खान देखील टीव्हीवर पुनरागमन करण्याच्या तयारीत आहे. काही दिवसांपूर्वीच या मोस्ट अवेटेड शोचा प्रोमो शेअर करण्यात आला होता. यामाध्यमातून हा शो १५ ऑक्टोबरपासून प्रसारित करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. या शोबाबत चाहत्यांची उत्सुकता वाढली असून ते शो कधी भेटीला येणार याची वाट पाहत आहेत.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.