Petrol Diesel Rate 2nd May 2024 Saam TV
बिझनेस

Petrol Diesel Rate 2nd May 2024: पुण्यात पेट्रोल महागलं अन् डिझेल स्वस्त झालं; वाचा तुमच्या शहरातील आजचे दर

Petrol Diesel Price Today : राष्ट्रीय तेल कंपन्यांनी आजच्या कच्च्या तेलाच्या किंमती सकाळी ६ वाजताच जाहीर केल्या आहेत. त्यानुसार तुमच्या शरहात आज पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढल्या की कमी झाल्या हे जाणून घेऊ.

Ruchika Jadhav

सध्या शाळांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या आहेत. त्यामुळे सर्वजण बाहेर फिरण्याचा प्लान करत आहेत. विविध ठिकाणी फिरण्यासाठी घराबाहेर पडायचं म्हणजे पेट्रोल-डिझेलच्या (Petrol Diesel) किंमती माहिती असणे गरजेचं आहे. राष्ट्रीय तेल कंपन्यांनी आजच्या कच्च्या तेलाच्या किंमती सकाळी ६ वाजताच जाहीर केल्या आहेत. त्यानुसार तुमच्या शरहात आज पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढल्या की कमी झाल्या हे जाणून घेऊ.

राष्ट्रीय तेल कंपन्यांनी दिलेल्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रातील पेट्रोल- डिझेलच्या किंमतीत बदल झालेला नाही. मात्र अन्य राज्यांमध्ये काहीप्रमाणात बदल दिसत आहे. मुंबई, कोलकत्ता, चेन्नई आणि दिल्ली या प्रमुख महानगरांमधील पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती आहेत तशाच स्थिर आहेत.

नवी दिल्लीमध्ये पेट्रोलची किंमत ९४.७२ रुपये तर डिझेल ८७.६२ रुपये प्रति लिटर आहे. कोलकत्तामध्ये पेट्रोलची किंमत १०३.९४रुपये तर डिझेल ९०.७६ रुपये प्रति लिटर आहे. मुंबईमध्ये पेट्रोलची किंमत १०४.२१ रुपये तर डिझेल९२.१५ रुपये प्रति लिटर आहे. चेन्नईमध्ये पेट्रोलची किंमत १००.७५ रुपये तर डिझेल ९२.३४ रुपये प्रति लिटर आहे.

महाराष्ट्रातील अन्य राज्यांमधील पेट्रेलचे दर

अहमदनगरमध्ये आज पेट्रोल १०४.६० रुपये प्रति लिटर आहे. काल १०४.५६ रुपये प्रति लिटरने विकले जात होते. म्हणजेच आज अहमदनगरमध्ये पेट्रोलची किंमती काहीशी कमी झालीये. अकोल्यात पेट्रोल १०४.३७ रुपये, अमरावतीमध्ये १०५.५८ रुपये प्रति लिटर आहे. कोल्हापुरात पेट्रोल १०४.८२ रुपये प्रति लिटर आहे. नागपूरमध्ये १०४.५६ रुपये प्रति लिटरने पेट्रोल विकलं जात आहे.

पुण्यातील पेट्रोल डिझेलच्या किंमती

डिझेल स्वस्त

पुण्यात डिझेलच्या किंमती २० पैशांनी कमी झाल्यात. येथे काल ९०. ५१ रुपये प्रति लिटर डिझेल मिळत होते. आज पुण्यात डिझेल ९१.३१ रुपये प्रति लिटर आहे.

पेट्रोल महागलं

पुण्यातील पेट्रोलच्या किंमतीत वाढ झाली आहे. काल १०३.९८ रुपये प्रति लिटर मिळणाऱ्या पेट्रोलची किंमत आज १०४.८१ रुपये प्रति लिटर आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan News : कल्याणमध्ये पोलिसांकडून २ वर्षांच्या मुलीवर गंभीर गुन्हा, काय आहे संपूर्ण प्रकरण? Video

Chandrashekhar Bawankule : फोन टॅपिंगनंतर आता मोबाईल सर्व्हिलन्स? बावनकुळेंच्या वक्तव्याने राज्यात खळबळ, VIDEO

Saturday Horoscope : विनाकारण कामांमध्ये येणाऱ्या अडचणीमुळे मनोबल कमी होईल; ५ राशींच्या लोकांना राहावे लागेल सावध

Maharashtra Government : राज्यात बांगलादेशी घुसखोरांना आळा बसणार; फडणवीस सरकारने उचललं मोठं पाऊल

Satara News : डॉक्टर महिलेचे आरोपीसोबत १५० हून अधिक कॉल, आत्महत्येपूर्वी काय घडलं? पोलीस तपासात महत्वाची माहिती समोर

SCROLL FOR NEXT