PETROL DIESEL CNG PRICE TODAY: INDIA READY FOR GLOBAL OIL MARKET VOLATILITY, FUEL RATES STABLE ON JUNE 11, 2026 Saam Tv
बिझनेस

Petrol Diesel Price : पश्चिम आशियातील तणावामुळे भारतीयांचं टेन्शन वाढलं! पेट्रोल-डिझेलचं दर वाढण्याची शक्यता, जाणून घ्या आजचे दर

Petrol Diesel Today Rate News : मध्य पूर्वेतील संघर्ष आणि स्ट्रेट ऑफ होर्मुझमधील वाढत्या तणावामुळे जागतिक तेल बाजारात अस्थिरता निर्माण झाली असली तरी ११ जून २०२६ रोजी भारतातील पेट्रोल, डिझेल आणि सीएनजीचे दर स्थिर ठेवण्यात आले आहेत.

Alisha Khedekar

  • मध्य पूर्वेतील तणावामुळे जागतिक तेल बाजारात अस्थिरता

  • ११ जून २०२६ रोजी पेट्रोल, डिझेल आणि सीएनजीचे दर स्थिर

  • महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये इंधन दरांमध्ये कोणताही मोठा बदल नाही

  • पुढील काही आठवड्यांत इंधन दरांवर परिणाम होऊ शकतो

मध्य पूर्वेत सुरू असलेल्या संघर्षामुळे आणि स्ट्रेट ऑफ होर्मुझ परिसरातील वाढत्या तणावामुळे आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या बाजारात अस्थिरता निर्माण झाली आहे. यामुळे देशातील पेट्रोल-डिझेलच्या दरात दिवसेंदिवस वाढ होताना पाहायला मिळत आहे. तसेच सर्वसामान्यांच्या खिशावर ताण येताना पाहायला मिळत आहे. असे असताना केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी भारत जागतिक तेल बाजारातील चढ-उतारांचा सामना करण्यासाठी पूर्णपणे सज्ज असल्याचे सांगितले.

पेट्रोल डिझेलचे दर अस्थिर का आहेत?

बुधवारी माध्यमांशी संवाद साधताना पुरी म्हणाले की, देशातील इंधन पुरवठा सुरळीत राहावा आणि ग्राहकांवर आर्थिक भार पडू नये यासाठी सरकार आवश्यक त्या उपाययोजना करत आहे. मात्र, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये अचानक मोठी वाढ झाल्यास सध्याच्या दरांचा फेरविचार करावा लागू शकतो, असेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, तेल कंपन्यांनी ११ जून २०२६ रोजीचे पेट्रोल, डिझेल आणि सीएनजीचे नवे दर जाहीर केले आहेत. आज इंधनाच्या दरांमध्ये कोणताही मोठा बदल करण्यात आलेला नसून दर स्थिर ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे वाहनचालकांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे.

महाराष्ट्रातील जिल्ह्यांमधील पेट्रोल डिझेलचे दर

महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये मुंबईत पेट्रोलचा दर १११.१८ रुपये तर डिझेलचा दर ९७.८३ रुपये प्रति लिटर आहे. पुण्यात पेट्रोल ११२.०४ रुपये आणि डिझेल ९८.६८रुपये, नागपुरात पेट्रोल १११.८० रुपये आणि डिझेल ९८.४८ रुपये दराने विकले जात आहे. नाशिकमध्ये पेट्रोल ११२.४४ रुपये तर डिझेल ९९.०७ रुपये आहे. कोल्हापुरात पेट्रोल ११२.५७ रुपये आणि डिझेल ९९.२३ रुपये, तर अमरावतीमध्ये पेट्रोल ११२.८९ रुपये आणि डिझेल ९९.५४ रुपये प्रति लिटर आहे. ठाण्यात पेट्रोल १११.३८ रुपये आणि डिझेल ९८ रुपये प्रति लिटर दराने उपलब्ध आहे.

महाराष्ट्रातील सीएनजीचे दर

सीएनजी दरांबाबत बोलायचे झाल्यास मुंबई आणि ठाण्यात ८६ रुपये प्रति किलो, पुण्यात ९६.५० रुपये, नागपुरात ८८.९० रुपये, नाशिकमध्ये ९३.६५ रुपये आणि कोल्हापुरात ९६.९५ रुपये प्रति किलो असा दर कायम ठेवण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे तेल बाजारावर दबाव कायम असला तरी सध्या देशातील इंधन दर स्थिर असल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. मात्र पुढील काही आठवड्यांतील जागतिक परिस्थितीवर इंधन दर अवलंबून राहणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: खून, दरोडा आणि चोरी! महाराष्ट्रात तब्बल ११९ गुन्हे दाखल असलेल्या अजयसिंहला अटक

मुंबईत जन्म प्रमाणपत्रांचा महाघोटाळा! 19,734 बनावट दाखले होणार रद्द; 4 वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांचे निलंबन

कॅन्सर केमोथेरपी दरम्यान खा 'हे' 7 पदार्थ

Type 2 diabetes: अचानक की ५ लक्षणं दिसली तर समजा टाईप २ डायबेटीज होण्याचा धोका वाढतोय

PM मोदी अन् अभिजीत दीपकेंची अमेरिकेत गुप्त भेट; खासदाराच्या दाव्यानं चर्चांना उधाण

SCROLL FOR NEXT