Budget 2025 Saam Tv
बिझनेस

Budget 2025: पेट्रोल- डिझेलच्या किंमती कमी होणार? अर्थसंकल्पात मोठी घोषणा होण्याची शक्यता

Petrol Diesel Price May Decrease After Budget: पेट्रोल डिझेलवर जीएसटी लावण्याची घोषणा अर्थसंकल्पात होऊ शकते. जर इंधनावर जीएसटी लावला तर पेट्रोल डिझेलचे भाव कमी होऊ शकतात.

Siddhi Hande

अर्थमंत्री निर्मला सितारामन १ फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प जाहीर करणार आहे. अर्थसंकल्पाकडून सर्वसामान्यांना खूप अपेक्षा आहे. शेतकरी, सर्वसामान्य नागरिकांना अर्थसंकल्पाकडून काय मिळणार, याकडे सर्वांचेच लक्ष आहे. हे मोदी सरकारच्या तिसऱ्या टर्ममधील हे पहिले अर्थसंकल्प असणार आहे. यामध्ये पेट्रोलियम प्रोडक्ट्सवर GST लागू करण्याची घोषणा होऊ शकते. (Budget 2025)

याबाबत एक्सपर्टच्या म्हणण्यांनुसार, जर पेट्रोल डिझेलवर GST दर लागू केले तर इंधनाच्या किंमती कमी होतील. सध्या पेट्रोल ९४ ते १०३ रुपयांवर विकले जात आहे. तर डिझेलची किंमत ८७ रुपये आहे. सध्या पेट्रोल डिझेलवर व्हॅट दर लावला जात आहे. त्यामुळे पेट्रोल डिझेलच्या किंमती वाढल्या आहेत. (Petrol Diesel Price Will Decrease)

सध्या पेट्रोल, डिझेल, नॅचरल गॅस, एविएशन टरबाइन फ्यूलवर एक्साइज ड्युटी आणि व्हॅट दर लावले जात आहे. सध्या सर्व प्रोडक्टसवर GST लागू केला आहे. फक्त पेट्रोल डिझेलवर व्हॅट दर आहे.त्यामुळे इंधनाच्या किंमती गेल्या अनेक दिवसांपासून कमी झाल्या नाहीत. जर सरकारने इंधनावर GST दर लागू केले तर किंमती कमी होऊ शकतात.यामुळेच सर्व राज्यात इंधनाचे दर सारखे असतील.

इंधनावर जर जीएसटी दर लागू झाले तर त्यावरील वेगवेगळे टॅक्स रद्द केले जातील. यामुळे किंमती कमी होऊ शकतात. पेट्रोल डिझेलच्या किंमती या बेसिक किमत यात कॉस्ट आणि ट्रान्सपोर्ट कॉस्टचा समावेश आहे. त्यानंतर डीलर कमिशन, एक्साइज ड्युटी आणि व्हॅट कर लावला जातो. व्हॅट कर हा वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळा आहे. त्यामुळे जर फक्त जीएसटी लागू केला तर सर्व राज्यांमध्ये पेट्रोल डिझेलचे भाव सारखे असतील.

याबाबत कन्फडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीने सरकारला इंधनावर एक्साइज ड्युटी कमी करण्याची मागणी केली होती. त्यानंतर व्हॅट दर रद्द करावा, अशीही मागणी केली जात आहेत. त्याच पार्श्वभूमीवर बजेटमध्ये मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Online Shopping: चुकूनही या 3 वस्तू ऑनलाईन खरेदी करू नका , पैसे जातील वाया

Gulab Jamun Recipe: तोंडात टाकताच विरघळणारा खव्याचा गुलाबजाम कसा बनवायचा? वाचा ही सिक्रेट रेसिपी

Maharashtra Live News Update : ऐन सणासुदीचा काळात सातपुड्यातील चांदसैली बनला मृत्यूचा घाट

मुंबई -पुणे मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७-८ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा|VIDEO

Narak Chaturdashi 2025: नरक चतुर्दशीला करा हे 5 लक्ष्मी उपाय, कर्ज आणि आर्थिक अडचणी होतील दूर

SCROLL FOR NEXT