Petrol Diesel Price Saam Tv
बिझनेस

Petrol Diesel Price Hike: सिलेंडरनंतर प्रीमियम पेट्रोल-डिझेलच्या किमती पुन्हा वाढल्या, वाचा नवे दर

Premium Petrol Price Hike: वाहनधारकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आता प्रीमियम पेट्रोल डिझेलच्या किंमतीत वाढ झाली आहे. तुमच्या शहरात कितीने दर वाढले ते जाणून घ्या.

Siddhi Hande

प्रीमियम पेट्रोच्या किंमती वाढल्या

वाहनधारकांच्या खिशाला फटका

आखाती देशातील युद्धाचा परिणाम

मध्य पूर्व आखाती देशांमध्ये सुरु असलेल्या युद्धामुळे संपूर्ण जगावर वाईट परिणाम होत आहे. या युद्धाचा फटका भारतालादेखील बसला आहे. कच्च्या तेलाचा पुरवठा व्यवस्थित होत नाहीये. परिणामी पेट्रोल डिझेलवर याचा परिणाम होत आहे. दरम्यान, एप्रिलच्या पहिल्याच दिवशी पेट्रोलच्या किंमती वाढल्या आहेत. आजच एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमतीतदेखील वाढली होती. त्यानंतर

प्रिमियम पेट्रोलच्या किंमती वाढल्या (Premium Petrol Price Hike)

इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने प्रिमियम इंधनाच्या दरात वाढ केली आहे. त्यामुळे प्रीमियम पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढल्या आहेत. याला XP100 पेट्रोल असेही म्हटले जाते.

दिल्लीत प्रीमियम पेट्रोलची किंमती १४९ रुपयांवरुन वाढून १६० रुपये झाली आहे. आता प्रति लिटरसाठी १६० रुपये मोजावे लागणार आहे. तर प्रीमियल डिझेलच्या किंमती ९१.४९ रुपयांवरुन ९२.९९ रुपये झाल्या आहेत. हे नवीन दर रात्री १२ वाजल्यापासून लागू झाले आहेत.

प्रीमियम पेट्रोल डिझेलच्या किंमती वाढल्याने वाहनधारकांच्या खिशाला फटका बसणार आहे. प्रीमियम इंधन पेट्रोल डिझेलच्या तुलनेत महाग असते.चांगल्या मायलेज आणि इंधन परफॉर्मन्ससाठी या इंधनाचा वापर केला जातो.

इंधनाचे दर का वाढले?

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत सातत्याने चढ-उतार होताना दिसत आहे. यामुळे डॉलरच्या तुलनेत रुपयादेखील घसरत आहे. याचसोबत रिफायनिंग आणि लॉजिस्टिक्सचा खर्च वाढल्याने इंधनाचे दर वाढत आहे. सध्या तरी प्रीमियम इंधनाच्या किंमती वाढल्या आहेत. याचा परिणाम सध्या तरी पेट्रोल डिझेलवर झाल्याचे दिसत नाहीये. मात्र, भविष्यात पेट्रोल डिझेलचे दरदेखील वाढण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Local: प्रवासी लोकलखाली आल्याने पश्चिम रेल्वेचे वाहतूक विस्कळीत; पाहा VIDEO

Trisha Krishnan: त्रिशा कृष्णनची राजकारणात एन्ट्री? पोटनिवडणूक लढवण्याची शक्यता

नंदूरबारमध्ये अग्नितांडव! नवापूर MIDC मध्ये कंपनीला भीषण आग, एकापोठापाठ ५ स्फोटामुळे परिसर हादरला

Maharashtra News Live Update: नालासोपारात गटारावरील जाळीत महिलेचा पाय अडकला

Kasara-Manmad Railway: पाच तालुके अन् ४५ गावातून धावणार कसारा-मनमाड रेल्वे; नाशिक-मुंबई प्रवास होणार जलद

SCROLL FOR NEXT