Petrol Pump Fraud Tips: कार आणि बाईकमध्ये पेट्रोल भरताना 5 गोष्टी लक्षात ठेवा, तुमची फसवणूक होणार नाही

Manasvi Choudhary

पेट्रोल टंचाई

अमेरिका- इस्त्रायल यांच्यातील युद्धामुळे भारतात पेट्रोल टंचाई निर्माण झाली नसली तरी मात्र काही ठिकाणी अफवा पसरल्याने पेट्रोल पंपावर लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

Petrol Pump Fraud Tips

पेट्रोल पंपावर होते गर्दी

तसेच येत्या काही दिवसांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या पुरवठा कमी होईल, किंमती वाढतील अश्याही अफवांमुळे पेट्रोल पंपावर गर्दी होत आहे.

Petrol Pump Fraud Tips

अशी घ्या काळजी

या भितीमुळे पेट्रोल पंपावर अनेक आपली वाहनांमध्ये काठोकाठ पेट्रोल भरत आहेत त्यांनी काही सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे.

Petrol Pump Fraud Tips

फसवणूकीचा होऊ शकतो सामना

कारण पेट्रोल पंपावर तुम्ही काही गोष्टींची खबरदारी न घेतल्यास तुमची फसवणूक देखील होऊ शकते.

Petrol Pump Fraud Tips

मीटर चेक करा

पंपावर तुम्ही कारमध्ये पेट्रोल भरत असाल तेव्हा कारमधून बाहेर पडून मीटरवर आणि इंधन भरणाऱ्या व्यक्तीवर लक्ष देणे महत्वाचे आहे.

Petrol Pump Fraud Tips

पंपावर मोबाईलवर बोलू नका

पेट्रोल भरताना मोबाईलवर बोलणे किंवा इकडे-तिकडे पाहणे टाळा. तुमचे दुर्लक्ष हीच फसवणूक करणाऱ्यांसाठी मोठी संधी असते..

Petrol Pump Fraud Tips

मशीन झीरो रिंडिंग आहे की नाही हे तपासा

कार किंवा बाईकमध्ये पेट्रोल टाकत असाल तर पेट्रोल पंपावरील मशीन झीरो रिडिंग आहे का ? याची तपासणी करा म्हणजे तुम्हाला अंदाज येईल की वाहनामध्ये किती इंधन टाकले जाते.

Petrol Pump Fraud Tips

Petrol Pump Fraud Tips

जुन्या रिंडिंगनुसार इंधन भरू नका

अनेकदा कर्मचारी जुन्या रिंडिंगनुसार इंधन भरतात ज्यामुळे इंधन कमी भरले जाते आणि बिल जास्त येते जर मीटरवर 0 रिडिंग दिसत नसले तर वेळीच लक्ष द्या.

Petrol Pump Fraud Tips

नोझल तपासा

पेट्रोल पंपावरील नोझलवर सरकारी वैधमापन विभागाचा शिक्का असल्याची खात्री करा. शिक्का तुटलेला असल्यास मशीनमध्ये छेडछाड झालेली असू शकते.

Petrol Pump Fraud Tips

next: Korean Glass Skin Tips: रात्री झोपण्यापूर्वी करा फक्त 'हे' 1 काम; 7 दिवसांत चेहऱ्यावर येईल नॅचरल ग्लो

येथे क्लिक करा..