Petrol Diesel Rate Saam Tv
बिझनेस

Petrol Diesel Rate: ...म्हणून पेट्रोल डिझेल किंमती वाढणार, महत्त्वाची ६ कारणं

Petrol Diesel Rate Will Increase: पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कच्च्या तेलाचा पुरवठा कमी होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे इंधनाचे दर वाढू शकतात.

Siddhi Hande

पेट्रोल डिझेलचे दर वाढण्याची शक्यता

कच्च्या तेलाचा पुरवठा कमी

रुपयाच्या किंमतीत घसरण

युद्धामुळे कच्च्या तेलाच्या पुरवठ्यात अडचणी

भविष्यात सर्वसामान्यांच्या खिशाला फटका बसण्याची शक्यता

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पेट्रोल डिझेल वाचवण्यास सांगितले आहे. यानंतर पेट्रोल डिझेलचे दर वाढणार का अशी चर्चा सुरु झाली आहे. भविष्यात पेट्रोल डिझेलचे दर वाढणार का आणि कितीने वाढणार असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहे. दरम्यान, सरकारने अजून पेट्रोल डिझेलच्या दराबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही. परंतु सर्वसामान्यांना महागाईची झळ बसू नये, यासाठी प्रयत्न सुरु आहे.

पेट्रोल डिझेलचे दर वाढण्याची कारणे (Petrol Diesel Price Hike)

दरम्यान, आता सरकारने सोने-चांदीसह इतर धातूंवर आयात कर वाढवला आहे. यामुळे सोने खरेदी कमी होईल आणि परदेशी चलन वाढवू शकतात. याचसोबत होर्मुज सामुद्रधुनीवर तणावाचे वातावरण असल्याने कच्च्या तेलाचा पुरवठा कमी झाला आहे. भारत आपल्या गरजेतील ८५ टक्के तेल आयात करते. दरम्यान, आता पुरवठा न झाल्याने इंधनाच्या दरात वाढ होऊ शकते. दरम्यान, अजून तरी असा कोणताही निर्णय घेतला नाही.

पीएम मोदींना नागरिकांना आवाहन केले आहे. त्यानंतर अनेक राज्य सरकारने इंधनाची बचत करण्यासाठी ठोस पाऊले उचलली आहे. सध्या कच्च्या तेलाचे दर १०० डॉलर प्रति बॅरल आहे. यामुळेच भविष्यात कच्च्या तेलाच्या वाढत्या किंमतीचा फटका सर्वसामान्यांना बसू शकतो.

रुपयाची किंमत घसरतेय

देशावर संकंट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ झाली आहे. याचसोबत डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमत घसरली आहे. त्यामुळे भारतात महागाई वाढू शकते.दरम्यान, सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तेल कंपन्यांचे रोज १००० कोटी रुपयांचे नुकसान होत आहे. त्यामुळे भविष्यात पेट्रोल डिझेलचे दर वाढण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: भोंदू अशोक खरातला 5 दिवसांची पोलिस कोठडी

Summer Drinks: उन्हाळ्यात उष्माघातापासून वाचवणारे 5 सर्वात बेस्ट ड्रिंक

School reopening: कडक उन्हात शाळा भरवण्यावरून हायकोर्टाने सरकारला फटकारले, ९ जूनला निर्णय

पुण्यात ब्युटी पार्लर चालवणाऱ्या महिलेला बेड्या, विद्यार्थ्यांना एजंटपर्यंत पोहोचवायची; NEET पेपरफुटीचं जाळं अधिक गडद

Office Etiquette Tips: तुम्ही कामाच्या ठिकाणी 'या' गोष्टी कधीही करू नका, तुमची इमेज होईल खराब

SCROLL FOR NEXT