Petrol Diesel Rate  Saam tv
बिझनेस

Petrol Diesel Rate Today: महिना अखेरीस पेट्रोल-डिझेलच्या दरात चढ-उतार सुरूच, जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे भाव

Siddhi Hande

जून महिन्याचा शेवटचा आठवडा सुरु झाला आहे. तरीही अजून पेट्रोल डिझेलच्या भावात कोणताही बदल झालेला नाही. मागील काही दिवसांपासून पेट्रोल डिझेलचे भाव कमी होणार असल्याच्या चर्चा होत्या. जवळपास २० रुपयांनी पेट्रोल डिझेलच्या किंमती कमी होणार असल्याच्या सांगण्यात येत होते. मात्र, जून महिन्याचा शेवटचा आठवडा सुरु झाला असूनही नागरिकांना दिलासा मिळाला नाही.

पेट्रोल डिझेलच्या भावात गेल्या काही दिवसांपासून काहीही बदल झालेला नाही. उलट अनेकदा पेट्रोल डिझेलचे भाव वाढले आहेत. पेट्रोल डिझेलचे भाव कमी होत नसल्याने सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला चांगलाच फटका बसत आहेत. जाणून घ्या तुमच्या शहरातील पेट्रोल डिझेलचे भाव.

महानगरांमधील पेट्रोल डिझेलचे भाव

देशाची राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोलची किंमत ९४.७६ रुपये आहे. तर डिझेलची किंमत ८७.६६ रुपये आहे. मुंबईत पेट्रोल १०४.१९ रुपयांना विकले जात आहे. तर डिझेलची किंमत ९२.१३ रुपये प्रति लिटर आहे. कोलकत्तामध्ये पेट्रोल १०३.९३ रुपयांना विकले जात आहे. तर डिझेलची किंमत ९०.७४ रुपये प्रति लिटर आहे. चेन्नईत पेट्रोल १००.७३ रुपये प्रति लिटर आहे तर डिझेलची किंमत ९२.३२ रुपये आहे.

महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील पेट्रोल डिझेलचे भाव

अहमदनगरमध्ये पेट्रोल १०४.१९ रुपयांना विकले जात आहे तर डिझेलची किंमत ९०.७३ रुपये आहे. नागपूरमध्ये पेट्रोल १०४.१४ रुपये प्रति लिटर आहे. तर डिझेलची किंमत ९०.७० रुपये आहे. पुण्यात पेट्रोल १०४.३२ रुपयांवर विकले जात आहे तर डिझेल ९०.८४ रुपये प्रति लिटर विकले जात आहे. ठाण्यात पेट्रोल १०४.३५ रुपये प्रति लिटरने विकले जात आहे तर डिझेलची किंमत ९२.२९ रुपये आहे. नाशिकमध्ये १०४.६९ पेट्रोल रुपये विकले जात आहे तर डिझेल ९१.२० रुपये प्रति लिटर विकले जात आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Horoscope Today : आज धाडसाने अनेक गोष्टी कराल, नको ती जबाबदारी अंगावर येऊन पडणार; वाचा आजचे राशीभविष्य

IND-W vs NZ -W: टीम इंडियाच्या फलंदाजांचा फ्लॉप शो! पहिल्याच सामन्यात न्यूझीलंडकडून दारुण पराभव

Pune News: पुण्याचं बदलापूर होतंय, वाचा स्पेशल रिपोर्ट...

MIM महाविकास आघाडीत सहभागी होणार? कोणत्या भागातून मागितल्या जागा? पाहा व्हिडिओ

Maharashtra Politics: मराठा आंदोलकांचे गुन्हे मागे घ्या, एसआयटी रद्द करा; काँग्रेस आमदारांची सरकारकडे मागणी

SCROLL FOR NEXT