Gold-Silver Rate : सत्तरी पार गेलेलं सोनं झालं स्वस्त; वाचा प्रति तोळ्याचा तुमच्या शहरातील आजचा भाव

Gold-Silver Price Fall :सणासुदीनिमित्त तुम्ही देखील दागिने खरेदी करण्याचा प्लान करत असाल तर आज तुम्ही दागिने खरेदी करू शकता.
Gold-Silver Price Fall
Gold-Silver RateSaam TV

सोन्याच्या दरांमध्ये या आठवड्यापासून सलग तीन दिवस घसरण झाल्याचं दिसत आहे. सोने-चांदीच्या किंमती कमी झाल्याने गुंतवणूकदारांनी दुकानांमध्ये गर्दी केली आहे. पावसाळा संपला की लगेचच गणपती, दसरा, दिवाळी या सणांची लगबग सुरू होते. सणासुदीनिमित्त तुम्ही देखील दागिने खरेदी करण्याचा प्लान करत असाल तर आज तुम्ही दागिने खरेदी करू शकता.

Gold-Silver Price Fall
Gold Silver Price Down : सोन्यासह चांदीचा भाव पुन्हा उतरला; वाचा मुंबई-पुण्यातील आजचे दर

२२ कॅरेट सोन्याच्या किंमती

आज २२ कॅरेट सोन्यच्या किंतमीमध्ये १०० रुपयांची घसरण झाली आहे. १०० ग्राम सोनं ६,६३,९०० रुपयांनी कमी झालं आहे. तर १० ग्राम सोनं ६६,३९० रुपयांवर आहे. ८ ग्राम सोन्याचा भाव ५३,११२ रुपये इतका आहे. १ ग्राम सोन्याचा भाव ६,६३९ रुपये इतका आहे.

२४ कॅरेट सोन्याची किंमत

१०० ग्राम २४ कॅरेट सोन्याचा भाव ७,२३,७०० रुपये इतका आहे. तर १० ग्राम सोन्याचा भाव ७२,३७० रुपये आणि ८ ग्राम सोन्याचा भाव ५७,८९६ रुपये. तसेच १ ग्राम सोन्याचा भाव ७,२३७ रुपये इतका आहे.

१८ कॅरेट सोन्याच्या किंमती

१८ कॅरेट १०० ग्राम सोन्याची किंमत ५,४३,२०० रुपये, १० ग्राम म्हणजे एक तोळा सोन्याचा भाव ५४,३२० रुपये आणि ८ ग्राम सोन्याचा भाव ४३,४५६ रुपये इतका आहे. तसेच १ ग्राम सोन्याचा भाव ५,४३२ रुपये इतका आहे.

विविध शहरांमधील सोन्याचा भाव

नवी दिल्लीत १ ग्राम सोन्याचा भाव - ६,६३९ रुपये आहे.

पटनामध्ये १ ग्राम सोन्याचा भाव - ६,६२९ रुपये आहे.

मुंबईत १ ग्राम सोन्याचा भाव - ६,६२४ रुपये

पुण्यात १ ग्राम सोन्याचा भाव - ६,६२४ रुपये

कोलकत्तामध्ये १ ग्राम सोन्याचा भाव - ६,६२४ रुपये आहे.

चांदीच्या घसरलेल्या किंमती

एक किलो चांदीच्या किंमती १०० रुपयांनी कमी झाल्यात. त्यामुळे एक किलो चांदीचा आजचा भाव ९०,९०० रुपये इतका आहे. तर १०० ग्राम चांदीचा भाव ९,०९० रुपये आणि १० ग्राम सोन्याचा भाव ९०९ रुपये इतका आहे.

मुंबईत एक किलो चांदीचा भाव - ९०,९०० रुपये

पुण्यात एक किलो चांदीचा भाव - ९०,९०० रुपये

पटनामध्ये एक किलो चांदीचा भाव - ९०,९०० रुपये

अहमदाबादमध्ये एक किलो चांदीचा भाव - ९०,९०० रुपये

कोलकत्तामध्ये एक किलो चांदीचा भाव - ९०,९०० रुपये

नागपूरमध्ये एक किलो चांदीचा भाव - ९०,९०० रुपये

Gold-Silver Price Fall
Gold Silver Price Down : सलग दुसऱ्या दिवशी सोने-चांदीच्या किंमती घसरल्या; वाचा तुमच्या शहरातील आजचा भाव

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com